भोकर उपविभागीय कार्यालयात वृक्षारोपणाने कृषि दिन साजरा
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : हरित क्रांतीचे प्रणेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै.वसंतराव नाईक यांच्या कृषी क्षेत्रातील मोलाच्या योगदानाची आठवण म्हणून त्यांचा जयंती दिवस हा ‘कृषि दिन’ म्हणून राज्यात साजरा केला जातो.याच अनुशंगाने दि.१ जुलै रोजी भोकर उपविभागीय अधिकारी कार्यालय व तहसिल कार्यालयाच्या प्रांगणात उपविभागीय अधिकारी राजेंद्र खंदारे व तहसिलदार राजेश लांडगे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात येऊन कृषि दिन साजरा करण्यात आला.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै.वसंतराव नाईक यांचा जन्मदिवस १ जुलै हा ‘महाराष्ट्र कृषि दिन’ म्हणून साजरा केला जातो.महाराष्ट्रामध्ये हरित क्रांती आणण्यामध्ये कै. वसंतराव नाईक यांचा मोलाचे योगदान आहे.त्यामुळे त्यांच्या कार्याची महती भावी पिढीला कळावी व सन्मानार्थ हा ‘कृषि दिन’ साजरा केला जातो.याच औचित्याने दि.१ जुलै २०२२ रोजी भोकर उपविभागीय अधिकारी कार्यालय व भोकर तहसिल कार्यालयात कै.वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात व यानंतर उपविभागीय अधिकारी राजेंद्र खंदारे आणि तहसिलदार राजेश लांडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यालयाच्या प्रांगणात “मिया वाकी” पद्धतीने वृक्षारोपण करण्यात आले.
या स्तुत्य उपक्रमात उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसिल कार्यालय,सामाजिक वनिकरण कार्यालयालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता.त्यात
संजय सोलंकर(नायब तहसीलदार),रेखा चामनर (नायब तहसीलदार),सतीश जोहरे (नायब तहसीलदार),सय्यद इस्माईल(नायब तहसीलदार),श्रीमती रामगुंडमवार (वनपरिक्षेत्र अधिकारी सा.व.प.क्षे.भोकर),नारायण शेलार (वनपाल),संपादक उत्तम बाबळे,ललिता भंडारे (स्टेनो), महेश वाकडे (मंडळ अधिकारी),शेख मूसा शेख सरवर (मंडळ अधिकारी),सविता कुसळे (मंडळ अधिकारी),सचिन आरु (मंडळ अधिकारी), संजय खेडकर (तलाठी), मिलिंद टोंपे(पेशकार),सखू शहाणे (पेशकार),वर्षा डहाळे (पेशकार),गजानन सोनटक्के (पेशकार),गंगाधर अडबलवार (पेशकार), गणपत शेळके (पेशकार),मिलिंद खरात (महसूल सहायक),साहेबराव भालेराव(महसूल सहाय्यक), दिलीप कावळे (महसूल सहाय्यक),जगदीश भाले(महसूल सहायक),श्रीमती राऊत (महसूल सहायक),भारत टेकाळे (महसूल सहायक), मोरे (महसूल सहायक),प्रशांत गोडबोले (महसूल सहायक), वंदना यमलवार(महसूल सहायक), सुनिता गोपेवाड (महसूल सहायक),रावसाहेब केंद्रे (एपीओ),नारायण कोपूरवार (डाफेदार),सुनिल टोंपे (शिपाई),वसियोद्दीन वसिम(शिपाई), कल्पना भिसे (शिपाई),सुदाम माझळकर (चालक) यांसह आदींचा समावेश होता.