भोकरमध्ये सेवा समर्पण च्या वतीने १५ नोव्हेंबर रोजी ‘दिवाळी पहाट’ चे आयोजन
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : विविध क्षेत्रात सेवाभावी कर्तव्याचे ठसा उमटविणाऱ्या भोकर येथील ‘सेवा समर्पण परिवारच्या’ वतीने प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी देखील दिवाळी निमित्त दि. १५ नोव्हेंबर रोजी पहाटे ५:३० वाजता सप्तसुरांची बहरणाऱ्या ‘दिवाळी पहाटच्या’ संगीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले असून इंडियन आयडॉल फेम ‘कु.शिवानी स्वामी’ यांच्या सुमधूर वाणीने विशेष रंगत येणार आहे.
भोकर शहरातील ऐतिहासिक कैलास गडावर माघील वर्षी दि.२२ ऑक्टोंबर २०२२ रोजी सेवा समर्पण परिवाराच्या वतीने आयोजित श्रोत्यांसाठीची ‘दिवाळी पहाट’ ही प्रसिद्ध गायक प्रा.प्रणव पडोळे निर्मित स्वरनिनाद गायन संचातील गायकांच्या सुरेल गायकीने व तालसौदर्याने सजलेल्या अद्वितीय सप्तसुरांच्या मंगलमयी संगीत अविष्काराने अक्षरशः बहरुन गेली होती.प्रतिवर्षा प्रमाणे यंदाही याच ठिकाणी दि.१५ नोव्हेंबर २०२३ रोजी दिवाळी पहाट साजरी करण्यात येणार आहे.सदरील दिवाळी पहाट संगीत मैफिलीचे उद्घाटन पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदीरे समिती व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्या हस्ते होणार आहे.तर या संगीत मैफिलीत इंडियन आयडॉल फेम कु. शिवानी स्वामी,संगीतरत्न प्रा.शिवदास स्वामी,प्रा.राजेश ठाकरे, प्रा.प्रणव पडोळे,शिवकांता पडोळे यांच्या अभिजात संगीताचा सुरेल नजराणा सादर होणार आहे. यावेळी दत्त संस्थानचे महंत उत्तमबन महाराज,जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवई, तहसिलदार राजेश लांडगे हे सहपत्नीक उपस्थित राहणार असून मुख्याध्यापक तथा साहित्यिक सुरेश दंडवते हे सदरील दिवाळी पहाट मैफिलीचे निवेदन करणार आहेत.तरी होऊ घातलेल्या दिवाळी पहाट कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित राहून सप्तसुरांचा स्वानंद घ्यावा,असे आवाहन सेवा समर्पण परिवार या सेवाभावी संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.