भोकरमध्ये भाजपाने केली ना.नवाब मलिक यांच्या मंत्रीपदाच्या राजिनाम्याची मागणी
तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने केला ना.नवाब मलिक यांच्या विरुद्ध झालेल्या कारवाईच्या निषेध
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : भारतीय जनता पार्टी तालुका भोकर च्या वतीने राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना सक्त अमलबजावणी संचनालयाने अटक केली असल्यामुळे त्यांना मंत्रीपदाच्या संविधानिक पदावर राहता येत नसल्याने त्यांना तात्काळ मंत्रीपदावरुन हटविण्यात यावे या मागणीसाठी मुख्यमंत्री यांना निवेदन पाठवले आहे;तर केंद्र सरकारच्या दबावाखाली सदरील कारवाई ही सुडबुद्धीने व अन्यायकारकरित्या केली असल्याने या कारवाईच्या निषेधार्थ भोकर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने तहसिलदार यांच्या मार्फत पंतप्रधान यांना दि.२५ फेब्रुवारी रोजी निवेदन पाठविण्यात येऊन निषेध व्यक्त करण्यात आला आहे.
अल्पसंख्याक मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सन १९९३ मध्ये मुंबईत साखळी बॉम्बस्फोट घडवून आणणाऱ्या कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम यांची बेनामी संपत्ती हसीना पारकर व त्यांच्या सहकाऱ्यांकडून घेतली आणि यात ‘मनीलॉन्ड्रींग’ करण्यात आली.अशा आरोपाखाली भारतीय सक्त अमलबजावणी संचलनालयाने अटक केली.तसेच मा. न्यायालयाने त्यांना ८ दिवसाची ईडी कोठडी सुनावली आहे. ना.नवाब मलिक यांच्यावर गंभीर आरोप ठेवण्यात आल्यामुळे त्यांना मंत्री पदावर राहण्याचा संविधानिक व नैतिक अधिकार नाही.त्यामुळे त्यांना तात्काळ मंत्रीपदावरून कमी करण्यात यावे.अशी मागणी भोकर तालुका भाजपाच्या वतीने करण्यात आली असून तालुकाध्यक्ष किशोर पाटील लगळूदकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपा राज्य कार्यकारणी सदस्य प्रकाश मामा कोंडलवार, जिल्हा उपाध्यक्ष दिलीप सोनटक्के,शहराध्यक्ष संतोष मारकवार,युवा तालुका अध्यक्ष श्रीकांत किन्हाळकर,भाजपा सहकार सेल जिल्हाध्यक्ष गणेश पाटील कापसे,संचालक राजू अंगरवार,जेष्ठ कार्यकर्ते नंदू भाऊ ऱ्याकावार,आनंद डांगे अनुसूचित जाती मोर्चा तालुका अध्यक्ष पत्रकार अनिल डोईफोडे यांसह आदींनी भोकरचे तहसिलदार राजेश लांडगे याच्या मार्फत मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना विवेदन पाठविले असून असे न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा ईशारा देण्यात आला आहे.
तर ना.नवाब मलिक यांच्यावर झालेल्या कारवाईच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसने दिले निवेदन
केंद्रात भाजपाची सत्ता असून या सत्तेच्या दबावाखाली राज्यातील मविआ सरकारचे मंत्री व अनेकांविरुद्ध केंद्रीय तपास यंत्रणा खोट्या कारवाया करत आहेत.याच अनुशंगाने ईडीने ना.नवाब मलिक यांच्या विरुद्ध सूडबुद्धीने खोटी कारवाई केली असून त्यांना अटक करुन नाहक त्रास दिला जात आहे.ही कारवाई चुकीची व निषेधार्य आहे.त्यामुळे आम्ही या कारवाईचा तीव्र निषेध व्यक्त करत आहोत व ना.नवाब मलिक यांना त्वरीत सोडण्यात यावे, झालेली कारवाई मागे घ्यावी.अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल. अशा आशयाचे निवेदन भोकर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने तालुकाध्यक्ष इंजि.विश्वांभर पवार यांच्या नेतृत्वाखाली व राष्ट्रवादी काँग्रेसचे भावी आमदार प्रा.डॉ. यशपाल भिंगे याच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा उपाध्यक्ष जवाजोद्दीन बरबडेकर,तालुका उपाध्यक्ष आनंद पाटील शिंधीकर,शहराध्यक्ष डॉ.फेरोज इनामदार,डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ.बोंदीरवाड, तालुका युवक अध्यक्ष गणेश (पप्पू) बोलेवार,युलक शहराध्यक्ष अफरोज पठाण,माजी नगरसेवक शेख वकील शेख खैराती, खाजा तौफिक इनामदार,रवि गेंटेवार,आनंथ जाधव,सिद्धू पाटील यांसह आदींनी तहसिलदार राजेश लांडगे यांच्या मार्फत देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना निवेदन पाठविले आहे आणि अटकेचा निषेध केला आहे.