Wed. Apr 16th, 2025

भोकरच्या आरोग्य मेळाव्यात २७ जणांनी अवयवदान व १३ जणांनी देहदानाची केली नोंदणी

Spread the love

आजादी का अमृत महोत्सवी वर्षा निमित्त भोकर ग्रामीण रुग्णालयाने आयोजित केला होता क्षतालुका स्तरीय आरोग्य मेळावा

अंबुज प्रहार प्रतिनिधी

भोकर : आजादी का अमृत महोत्सवी वर्षा निमित्त केंद्र शासनाच्या सुचनेवरुन ग्रामीण रुग्णालय भोकर येथे दि.२२ एप्रिल रोजी घेण्यात आलेल्या आरोग्य मेळाव्यात ६०५ रुग्णांची नोंदणी व तपासणी करण्यात आली असून विशेष बाब म्हणजे यावेळी २७ जणांनी अवयवदान आणि १३ जणांनी देहदानासाठी नोंदणी केली आहे.

संपन्न झालेल्या या तालुकास्तरीय आरोग्य मेळाव्याचे उद्घाटन भोकर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अमित राठोड यांनी केले. यावेळी डॉ.हनमंत पाटील (बाह्य रुग्ण संपर्क निवासी वैद्यकीय अधिकारी नांदेड),डॉ.संदेश जाधव (जिल्हा आयुष अधिकारी नांदेड), यांची प्रमुख उपस्थिती होती.मेळाव्याचे आयोजक या नात्याने भोकर ग्रामीण रुग्णालयाचे अधिक्षक डॉ.अशोक मुंडे यांनी प्रास्ताविक केले. तर भोकर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राहुल वाघमारे यांनी मनोगतातून मेळाव्याविषयी सविस्तर माहिती सांगितली.

सदरील आरोग्य मेळाव्यात ६०५ रुग्णांची नोंदणी व तपासणी करण्यात आली.यात डिजिटल हेल्थ आयडी १६० तयार करण्यात आले, आयुष्मान भारत योजनेचे ५० कार्ड वाटप करण्यात आले.१० रक्तदात्यांनी रक्तदान केले,१०२ टेलिकन्शलन,७१ जणांची नेत्रतपासणी,१० जणांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया व संदर्भ सेवा देण्यात आली,तसेच उच्य रक्तदाब, ऱ्हदयरोग एन.सी.डी.विभाग २५४ तपासणी,१७ जणांची दंतरोग तपासणी,७ एक्सट्रेक्ट,कान,नाक,घसा ३० जणांची तपासणी,५१ जणांची रक्त तपासणी, १२ जणांची क्ष-किरण तपासणी,४२ जणांची आयुर्वेद तपासणी,४० जणांची युनानी व ५० जणांची होमिओपॅथी तपासणी आणि निदान करण्यात आले.विशेष बाब म्हणजे अवयव दानाचे महत्त्व लक्षात घेऊन २७ जणांनी अवयवदान व १३ जणांनी देहदानासाठी नोंदणी केली.

मेळाव्या दरम्यान स्त्रीरोग तज्ञ तथा वैद्यकीय अधिकारी डॉ.माधव विभुते यांनी रुग्णांना योग्य ती माहिती देऊन त्या त्या विभागात तपासणी व निदानासाठी पाठविण्याची सेव बजावली.तर विशेष तज्ञ म्हणून डॉ. सारीका जेवळीकर,डॉ.सागर रेड्डी (बालरोग तज्ञ),डॉ.बाळासाहेब बिऱ्हाडे,डॉ.अस्मीता भालके(भुलतज्ञ),डॉ.नितीन कळसकर(अस्थीरोग तज्ञ),डॉ.संतोष अंगरवार(सर्जन),डॉ.संजय पोहरे(कान नाक घसा तज्ञ), डॉ.राजाराम कोळेकर(दंत शल्यचिकित्सक तसेच गोदावरी हॉस्पिटल नांदेड विशेष तज्ञ) यांनी सेवा बजावली.याच बरोबर जीवन आधार ब्लड बँक नांदेड येथील जगदीश सोनकांबळे,शेखर कांबळे,प्रणिता जाधव,नेहल सुरवसे यांनी रक्तदान शिबिर सेवा दिली.तसेच भोकर येथील नर्सिंग कॉलेज मधील आरोग्य सेविकांना देखील सेवा बजावली.

तर डॉ.व्यंकटेश निलेवार(वैद्यकीय अधिकारी मोघाळी),डॉ.उमेश जाधव,डॉ.जगदीश राठोड,डॉ.प्रणिता राहटीकर,डॉ.अर्चना गिरी,डॉ. विप्रमा पवार,डॉ.शितल सोनटक्के,डॉ.रजंना तोटेवाड,डॉ.एकबाल, डॉ.गजानन डाकोरे,डॉ.तिरुपती गनुवाड,डॉ.चिटकुलवार,डॉ.गजानन कोलपवार(समुदाय आरोग्य अधिकारी),डॉ.व्यंकटेश टाकळकर,डॉ. अविनाश गुंडाळे,डॉ.थोरवट,डॉ.मुद्शीर,डॉ.अपर्णा जोशी,डॉ.ज्योती संगेवार,डॉ.गणेश जंगीलवाड,सत्यजीत टिप्रेसवार(आरोग्य पर्यवेक्षक), संतोष करपे नेत्रचिकित्सक,श्रीमती नवघडे,ब्राम्हणे,डवरे,माटोरे,शेंडगे, बोड्डेवाड(अधिपरीचारीका),बालाजी चांडोळकर,मनोज पांचाळ, अत्रीनंदन पांचाळ(प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी),सय्यद एम.ए., दादाराव माचेवाड(आरोग्य सहाय्यक),संजय देशमुख (सहाय्यक अधिक्षक),साबेर पाशा(लिपिक),गंगामोहन शिंदे, मल्हार मोरे,संदिप ठाकूर,गिरी रावलोड(औषध निर्माण अधिकारी),कु.रोहीणी भटकर (क्ष किरण वैज्ञानिक अधिकारी),पांडुरंग तम्मलवाड,नामदेव कंधारे(आरोग्य कर्मचारी),अतुल आडे,श्रीमती सरस्वती दिवटे,संगीता पंदीलवाड,मुक्ता गुट्टे , भालेराव,भिसे,सुवर्णकार(आरोग्य सेविका),माया आडे(डाटा ऑपरेटर),सुरेश डुम्मलवाड(समुपदेशक),सुधाकर गंगातीरे (आरोग्य मित्र),डाकोरे(वाहन चालक),बाबु मिया,शिंदे,नासेर,वडेलू,माटोरे (हत्तीरोग कर्मचारी),व्यंकटेश पुलकंठवार(आरोग्य सहाय्यक),विठ्ठल मोरे,प्रदिप गोधणे(आरोग्य कर्मचारी),गणेश गोदाम,राजु चव्हाण,पांडुरंग खोकले (क्षेत्र कर्मचारी),तसेच भोकर तालुक्यातील भोसी,किनी व मोघाळी या ३ प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी,समुदाय आरोग्य अधिकारी,आरोग्य सहाय्यक,आरोग्य सेवक,आरोग्य सेविका, आशा ताई,अंगणवाडी ताई,ग्रामीण रुग्णालय भोकर येथील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी सदरील आरोग्य मेळावा यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले आणि मेळाव्याच्या सांगतेचे आभार प्रदर्शन डॉ.विजया किनीकर यांनी केले.


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !