भोकरचे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश मंदार पांडे यांची अहमदनगर येथे बदली
राज्यातील १ हजार १३ न्यायाधीशांच्या बदल्या झाल्या असून नांदेड जिल्ह्यातील ५ जिल्हा न्यायाधीश,७ वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश व १९ प्रथमवर्ग न्यायाधीशांचा यात समावेश आहे.
अंबुज प्रहार प्रतिनिधी
नांदेड : मुंबई उच्च न्यायालयाने राज्यातील १ हजार १३ न्यायाधीशांच्या सार्वत्रिक बदल्यांचे आदेश उच्च न्यायालयाचे महाप्रबंधक एम.डब्ल्यू चांदवाणी यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आले आहेत.यात २४७ जिल्हा न्यायाधीश,२३३ दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर आणि ५३३ प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांचा समावेश आहे.तर नांदेड जिल्ह्यातून ३१ न्यायाधीश बदलून दुसरीकडे जाणार आहेत आणि २७ न्यायाधीश नांदेड जिल्ह्यात येणार आहेत.यात ५ जिल्हा न्यायाधीश जाणार आणि ५ येणार,७ दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर जाणार आणि ७ येणार,तर १९ प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जाणार आणि १५ येणार असून भोकर न्यायालयातून दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर मंदार पी.पांडे यांची बदली अहमदनगर येथे झाली आहे व त्यांची जागेवर अंधेरी मुंबई येथून न्यायाधीश ए.ए. पाचभाई हे येणार आहेत.
नांदेड येथून बदलून जाणारे जिल्हा न्यायाधीश आणि त्यांची नवीन नियुक्ती पुढील प्रमाणे…
कमलकिशोर गौतम-औद्योगिक न्यायालय पुणे,कंधार येथील ए.एस. सलगर-सीटी सिव्हील कोर्ट मुंबई,कुटूंब न्यायालयातील एन.डी.खोसे गोंदिया,मुखेड येथील एन.पी.त्रिभुवन सीटी सिव्हील कोर्ट मुंबई, बिलोलीचे डी.आर.देशपांडे-संगमनेर जि.अहमदनगर,
नांदेड येथे येणारे जिल्हा न्यायाधीश पुढीलप्रमाणे…
श्रीमती एम.ए.आनंद- पनवेल रायगड (कंधार),डी.ई. कोठालीकर मुंबई (बिलोली),सी.व्ही.मराठे- मुंबई (नांदेड),श्रीमती एस.बी.महाले-मुंबई (कंधार),श्रीमती एस.पी.अग्रवाल- मुंबई (नांदेड कुटूंब न्यायालय).
नांदेड येथून बदलून जाणारे दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर पुढीलप्रमाणे…
विधीसेवा प्राधिकरण सचिव आर.एस.रोटे (अहमदनगर),सचिन सुर्यकांत पाटील (कामगार न्यायालय अमरावती),मुखेड येथील एस.टी.शिंदे(नागपूर).भोकर येथील एम.पी.पांडे (अहमदनगर), एम.पी.शिंदे (पुणे),मयुरा यादव (अमरावती),एम.बी.कुलकर्णी (नाशीक).
नांदेड येथे येणारे नवीन दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर पुढीलप्रमाणे…
ए.ए.पाचभाई-मुंबई अंधेरी (भोकर),वाय.बी.गमे-मुंबई (मुखेड),श्रीमती ए.के.मांडवगडे-अहमदनगर(नांदेड),श्रीमती के.पी.जैन सोलापूर (नांदेड),डी.एम.नागपूर (नांदेड),आर.बी.राजा-वर्धा (नांदेड),श्रीमती आर.आर.लोहिया-वर्धा (नांदेड).
नांदेड येथून बदलून जाणारे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पुढीलप्रमाणे…
पी.जी.तापडीया-नांदेड (पुणे),एस.जी.बर्डे-देगलूर (पुणे),डब्ल्यू.ए. सय्यद नायगाव (सांगली),आर.आर.पत्की बिलोली (ठाणे),एस.आर. कुलकर्णी-नांदेड (नाशिक),आर.पी.घोले-नांदेड (सहकार न्यायालय नाशिक),पी.जी.बारटक्के-देगलूर (बाभुळगाव यवतमाळ),पी.बी.तौर लोहा (कल्याण ठाणे),एस.जी.शिंदे- मुखेड (कोल्हापूर),आर.बी. सौरेकर-नायगाव (कोल्हापूर),सुविधा पांडे-हदगाव (नंदुरबार),जी.सी. फुलझळके-नांदेड (मानगाव,रायगड),के.एम.चंडालिया हिमायतनगर (सांगली),एन.एल.गायकवाड नांदेड (सहाय्यक धर्मदाय आयुक्त ठाणे), पी.यु.कुलकर्णी-नांदेड (मालेगाव वाशीम),पी.के.धोंडगे- लोहा (सहायय्क धर्मदाय आयुक्त ठाणे).एन.ए.एन.मुद्दसर-नांदेड (वाशी ठाणे),एस.आर.बडवे नांदेड (फलटन सातारा).एच.के. वानकर-नांदेड (सहकार न्यायालय सांगली).
नांदेड येथे येणारे नवीन प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पुढीलप्रमाणे…
ए.आर.मोहाने दहीवडी सातारा (देगलूर).एम.आर.स्वानी-परांडा उस्मानाबाद(नांदेड),व्ही.व्ही.सावरकर-नागपूर (बिलोली),श्रीमती पी. एस.जाधव खेड रत्नागिरी (नांदेड),के.आर.कोंडारे- तासगाव सांगली (हिमायतनगर),श्रीमती ए.एच.ठाकूर फलटण सातारा (सहकार न्यायालय नांदेड),ए.व्ही.डाखोरे मुंबई (लोहा), श्रीमती.आर.एन.खान-ईगतपुरी नाशिक (देगलूर),अश्विनी बी. पाटील-डहाणू ठाणे (नायगाव बाजार),एन.एस.बारी मुंबई (मुखेड),एस.बी.गावडे- कामठी नागपूर (माहूर),एस.एल.वैद्य- सिंदखेडा धुळे (लोहा),श्रीमती व्ही.व्ही.चौधरी बल्लारपूर चंद्रपूर (सहाय्यक धर्मदाय आयुक्त नांदेड),एस.आर.पाटील-पुणे (हदगाव),आर.एम.लोलगे-रावेर जळगाव (नायगाव बाजार).
न्याय व्यवस्थेतील कर्तव्य कठोर व मृदू ह्रदयी समाजसेवी व्यक्तिमत्त्व न्यायाधीश मंदार पांंडे
भोकर न्यायालयात सेवारत वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश मंदार पांडे (एम.पी.पांडे) यांनी गेल्या तीन वर्षात न्याय व्यवस्थेत न्यायाधीश म्हणून अनेक अपप्रवृत्तींना कठोर शासन देण्याचे व पिडीतांना न्याय देण्याचे कर्तव्य बजावले आहे.यामुळे त्यांना न्याय व्यवस्थेतील कर्तव्य कठोर व्यक्तिमत्व न्यायाधीश म्हणून ओळखल्या जाते.तर विधीसेवेसह आरोग्यसेवेचा “भोकर पॅटर्न” देणारे जिल्हा न्यायाधीश मुजीब एस.शेख यांच्या समवेत,नव्हे तर खांद्याला खांदा लाऊन कोरोना प्रादुर्भाव नियंत्रण कार्यकाळात त्यांनी अनेक समाजसेवी कर्तव्य बजावले आहेत. जसे की,वृक्षारोपण व संवर्धन,स्वच्छता मोहीम,आरोग्य तपासणी व औषधी वाटप शिबिर,रक्तदान शिबिर यांसह आदी उपक्रम यशस्वी करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.एक वरिष्ठ स्तरीय न्यायाधीश असतांना देखील त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून कोरोना प्रादुर्भाव नियंत्रण प्रबोधन मोहिमेत रस्त्यावर उतरुन शहरातील भिंतीवर स्वतःच्या हाताने पोस्टर चिटकविली व वाटप ही केली.याच बरोबर निराश्रित,गरीब व गरजूंना अन्न धान्य वाटप करुन भुख भागविण्याचे कर्तव्य बजावले.त्यांनी बजावलेल्या या समाजसेवी कर्तव्यामुळे मृदू ह्रदयी समाजसेवी व्यक्तिमत्त्व म्हणून न्यायाधीश मंदार पांडे यांना भोकर व परिसरातील जनतेत ओळखल्या जाते.
जिल्हा न्यायाधीश मुजीब एस.शेख आणि न्यायाधीश मंदार पांडे यांनी न्याय व्यवस्थेतील कर्तव्याबरोबरच सामाजिक क्षेत्रात केलेल्या लोकोपयोगी समाजसेवी कर्तव्याची छाप या परसरातील जनसामान्यांच्या ह्रदयावर अनेक वर्ष अविस्मरणीय ठेवा म्हणून राहणार आहे.तसे पाहता हे दोन्ही न्यायाधीश म्हणजेच ‘न्याय पंढरीचे वारकरी.’आणि वारकरी म्हटलं की ते कुठे ही जावोत न्यायाची व सेवेची योग्य आणि अभिमानास्पद भुमिका पार पाडतच राहणार यात कसलीही शंका नाही.जिल्हा न्यायाधीश मुजीब एस.शेख हे अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंधा येथे सेवारत आहेत.तर न्यायाधीश मंदार पांडे यांची बदली देखील आता अहमदनगर येथेच झाली आहे.त्यामुळे ‘न्याय पंढरीच्या दोन्ही वारकऱ्यांना’ एकाच जिल्ह्यात कर्तव्यसेवा बजावण्याची संधी मिळाली आहे.या दोन्ही कर्तव्य कठोर व्यक्तिमत्वांनी भोकर तालुक्यात जे समाजसेवी,लोकोपयोगी कर्तव्य बजावलं आहे ते कदापिही विसरल्या जाणार नाही.अशा दोन्ही समाजसेवी व्यक्तिमत्त्वांसोबत सामाजिक,लोकोपयोगी उपक्रम व कार्यक्रमात सहभागी होऊन काम करता आले आणि बरेच काही शिकता आले…
त्यांना भावी सेवाकर्तव्यासाठी मनापासून शुभेच्छा !
उत्तम बाबळे,संपादक