Fri. Dec 20th, 2024
Spread the love

मुक्ता शं.पेटकर,नांदेड

नांदेड : नांदेड जिल्हा भावसार क्षत्रिय समाज कार्यकारणी तर्फे पंधरावा उपवधू-वर परिचय मेळावा  मातोश्री मंगल कार्यालय जुना कौठा, नांदेड येथे भव्य दिव्य स्वरूप व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला आहे.

या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी डॉ.व्यंकटेश काब्दे हे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून खासदार हेमंत भाऊ पाटील,पुणे येथील उद्योजक अनिल ढवळे,जालना येथील सामाजिक कार्यकर्त्या रेणुका भावसार,उद्योजक गिरीश वायचाळ,समाज कल्याण अधिकारी तेजस माळवदकर, सामाजिक कार्यकर्त्या सौ.राजश्री हेमंत पाटील,जिल्हा भावसार समाजाचे अध्यक्ष गंगाधर बडवणे,सचिव सुरेश गोजे,कार्याध्यक्ष गिरीश बुलबुले,लक्ष्मीकांत माळवतकर यांसह आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

या प्रसंगी बोलतांना खा.हेमंत भाऊ पाटील म्हणाले की,नांदेड जिल्हा भावसार समाजाने औंढा नागनाथ येथे १० हजार स्क्वेअर फुट जागा उपलब्ध करून दिल्यास तेथे भव्य वास्तु उभारणीसाठी मी निधी उपलब्ध करून देतो.नव्हे तर आज १० लाख रुपयांचा निधी मी त्यासाठी जाहीर करत आहे,असे ही ते म्हणाले.यावेळी उपस्थित मान्यवरांनी मेळाव्यास अनुसरुन समायोजित मनोगत व्यक्त केले.

समाजातील अकराशे उपवधु-वरांची संकलितरुपी ‘ अनुरूप’ नावाची स्मरणिका मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आली. तसेच भव्य प्रांगणात चार डिस्प्ले स्क्रीनच्या मदतीने उपवधू-वरांचा बायोडाटा उपस्थित मान्यवरांसह समाज बांधवांना दाखविण्यात आला.मेळाव्यास उपस्थित असलेल्या उपवधू -वर,पालक व नातेवाईक अशा जवळपास १० हजार व्यक्तींची अतिशय अल्प दरात चहा,नाश्ता व भोजनाची व्यवस्था आयोजक समाज बांधवांतर्फे करण्यात आली होती.समाजातील उपवधू-वरांना व्यासपीठावर बोलावून आयोजकांनी उपस्थितांना परिचय करून दिला.उपवधू-वर व पालक यांच्यात चर्चा होऊन विचारांची देवाणघेवाण व्हावी म्हणून २० समन्वय कक्षांची विशेष व्यवस्था याप्रसंगी करण्यात आली होती.सदर मेळाव्याचा महाराष्ट्रा व्यतिरिक्त आंध्र प्रदेश,तेलंगाना राज्य,गुजरात,मध्य प्रदेश राज्यातील जवळपास ८ हजार समाज बांधवांनी लाभ घेतला.

सदरील मेळाव्याच्या यशस्वितेसाठी नांदेड जिल्हा भावसार समाज,१५ वा उपवधू-वर परिचय मेळावा समिती नांदेड, भावसार युवा मंडळ,भावसार प्रगती महिला मंडळ,भावसार सेवा संघ,तसेच सामाजिक कार्यकर्ते,स्वयंसेवक,महिला मंडळ,व्यापारी,कर्मचारीवर्ग यांसह आदिंनी परिश्रम घेतले.


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !