भाजपाचे अजय टाक यासह अनेकांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश
शिवसेना शिंदे गटाचे उपनेते खासदार हेमंतभाऊ पाटील यांच्या उपस्थितीत भोकर तालुक्यातील अनेकांचा तालुका प्रमुख अमोल पवार यांनी करुन घेतला हा प्रवेश
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट शिवसेनेच्या पदाधिकारी व शिवसैनिकांची बीकेसी मैदान मुंबई येथील दसरा मेळावा यशस्वीतेसाठी पुर्वतयारीस्तव नियोजन बैठकांचे सत्र नांदेड जिल्ह्यात सुरु केलेले असतांनाच दरम्यानच्या काळात अनेक कार्यकर्ते शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत आहेत.याच अनुशंगाने दि.१ ऑक्टोबर रोजी शिवसेना शिंदे गटाचे उपनेते खासदार हेमंतभाऊ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विश्रामगृह नांदेड येथे घेण्यात आलेल्या बैठकीत भोकर तालुका प्रमुख अमोल पवार यांच्या नेतृत्वात भाजपा युवा मोर्चाचे पदाधिकारी अजय टाक यांसह अनेकांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे.
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे याच्या विचाराने प्रेरित होऊन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे यांनी शिवसेना शिंदे गटाच्या भव्य दसरा मेळाव्याचे बीकेसी मैदान मुंबई येथे आयोजन केले आहे.त्या अनुशंगाने असंख्य शिवसैनिक या मेळाव्यास जाण्याची तयारी करत आहेत.राज्यात पुर्वतयारीसाठीच्या बैठकांचे आयोजन केल्या जात आहे.याच दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेना शिंदे गटात अनेक कार्यकर्ते प्रवेश करत आहेत.याच औचित्याने शिवसेना शिंदे गटाचे उपनेते खा.हेमांतभाऊ पाटील, शिवसेना संपर्कप्रमुख आनंद जाधव, जिल्हा प्रमुख आनंदराव पाटील बोंढारकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना भोकर तालुका प्रमुख अमोल धनराज पवार यांच्यावर विश्वास ठेवून व युवा सेनेचे स्वप्नील रेड्डी यांच्या उपस्थितीत भाजपा युवा मोर्चाचे पदाधिकारी अजय टाक, प्रहार युवा तालुकाध्यक्ष गोवर्धन चिंचबनकर,मौ.डौर ता. भोकरचे सरपंच प्रतिनिधी विष्णु दंडेवाड यांच्यासह ४० कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश जाहीर प्रवेश केला आहे.यावेळी आमदार बालाजी कल्याणकर, जिल्हाप्रमुख उमेश मुंडे,सहसंपर्कप्रमुख गंगाधर बडूरे,शेतकरी सेमीचे प्रल्हाद इंगोले,युवा सेनेचे विकास देशमुख यांसह आदींची उपस्थिती होती.तर दसरा मेळाव्यासाठी मुंबईला जाण्याची तयारी करण्यात आली असून बहुसंख्येने सहभागी व्हावे असे आवाहन भोकर तालुका प्रमुख अमोल पवार यांनी केले आहे.