Mon. Dec 23rd, 2024

भरकटलेल्यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ग्रामगीताच तारुण नेईल-गजेंद्र चैतन्य स्वामी

Spread the love

अंबुज प्रहार प्रतिनिधी

भोकर : आज समाजामध्ये वाईट गोष्टींचे आचरण केल्या जात आहे,युवकांची स्थिती बिघडत चाललेली दिसत आहे.सोळा वर्षाची मुलं दारू पिताना दिसतात व डीजे च्या तालावर नाचून मोबाईल मध्ये गुंग राहतात.अशा भरकटत चाललेल्या समाजाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ग्रामगीताच तारून नेऊ शकते, असे महत्वपूर्ण विचार बालयोगी गजेंद्र चैतन्य स्वामी यांनी भोकर येथे बोलताना मांडले.

भोकर येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्मारक समितीच्या वतीने बांधण्यात आलेल्या सामुदायिक प्रार्थना मंदिराचा उद्घाटन सोहळा दि.१५ मार्च २०२२ रोजी स्वामी गजेंद्र चैतन्यजी महाराज,बाल योगी व्यंकट स्वामी पिंपळगाव,महंत उत्‍तम बन महाराज,चैतन्य बाबा कांडली,परमेश्वर महाराज सिरंजनीकर यांच्या हस्तेसंपन्न झाला.यावेळी बोलताना बालयोगी गजेंद्र चैतन्यजी स्वामी म्हणाले की भोकर मध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचाराचे केंद्र सामुदायिक प्रार्थना मंदिर स्थापन झाले ही मोठी आनंदाची बाब आहे,ग्रामगीतेत राष्ट्रसंतांनी ग्राम विकासाचा मंत्र दिला.त्यांच्या विचारांचा प्रचार प्रसार होण्याची आज खरी गरज आहे,प्रत्येक गोष्टीचे तिच्या मुळाशी दुख आहे, आजचा समाज भरकटत चाललेला आहे,सोळा वर्षाची मुलं दारूच्या नशेत झिंगताना दिसतात,भगतसिंग राजगुरू या देशाच्या स्वातंत्र्यासाठी फासावर चढले,आजची युवा पिढी दारू मध्ये धुंद होऊन डीजेच्या तालावर नाचू लागली आहे.निसर्गाने माणसांनी वागावं कसं हे कोरोणा संकट काळामध्ये शिकवलं, माणसाच्या मनोवृत्तीचा चांगला विकास व्हावा,ग्रामगीतेत जीवनाचा अर्थ सांगितलेला आहे,ज्यांचे आहार विहार विचार चांगले त्यांचे जीवनही चांगले, आपल्या मुलांना सुसंस्कारी बनवा,देशाप्रती प्रेम बाळगा व्यसनापासून दूर रहा,संतांचे विचार अंगी बाळगा असेही शेवटी ते म्हणाले.बालयोगी वेंकटस्वामी दत्त संस्थान पिंपळगाव यांनीही प्रार्थना मंदिराची विधिवत पूजा करून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता आदर्श जीवनाचा मार्ग दाखवणारी आहे,तीआपल्या आचरणात आणावी,गावा-गावात प्रचार झाला पाहिजे,असे विचार मांडले.तर मोहन कावडे महाराज हसणालीकर,रवी मानव गुरुकुंज आश्रम मोझरी यांनी युवकांच्या मनामध्ये ग्राम गीता रुजावी,व्यसन मुक्ती व्हावी, सुसंस्कारी पिढी निर्माण व्हावी,असे महत्त्वपूर्ण ओजस्वी विचार मांडले.

उपविभागीय अधिकारी राजेंद्र खंदारे यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगीतेचे प्रचार केंद्र भोकर मधून सुरू व्हावं अशी संकल्पना मांडली,जि.प.चे कृषि व पशुसंवर्धन सभापती बाळासाहेब पाटील रावणगावकर यांनी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्मारक समितीच्या विकासा साठी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांना माहिती देऊन निधी उपलब्ध करून देण्याबाबत विनंती करू,असे आश्वासन दिले.तर तहसीलदार राजेश लांडगे,बहुजन नेते नागनाथ घिसेवाड,ज्ञानेश्वर महाराज केसाळे,चैतन्य बाबा कौंडल्याऋषी आश्रम यांनीही यावेळी विचार मांडले.

प्रास्ताविकात संस्थेचे सहसचिव बी.आर.पांचाळ यांनी विविध उपक्रमाची माहिती देऊन बाल संस्कार केंद्र,सामुदायिक प्रार्थना व ध्यान असे कार्यक्रम नित्य नेमाने याठिकाणी चालवून ग्रामगीता प्रसार करण्यात येईल असे मत मांडले.या कार्यक्रमास गोपाळ महाराज मुरझळेकर,माजी सभापती गोविंद बाबागौड,सुभाष पाटील किन्हाळकर,भगवान दंडवे,बाबुराव अंदबोरीकर,किशोर पाटील लगळुदकर,श्याम सुंदर पाटील,प्रकाश मामा कोंडलवार, संतोष आलेवाड,सुनिताताई बाभळीकर,माधवराव पाटील मातूळकर,उज्वल केसराळे,सुभाष पाटील कोळगावकर,शेषराव पाटील,बालाजी पाटील, सावरगाव कामठा गुरुदेव सेवा मंडळ लगळुद,गुरुदेव सेवा मंडळ यांच्यासह तालुक्यातील गुरुदेव प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते, प्रास्ताविक व सुत्रसंचालन बी.आर.पांचाळ यांनी केले.तर उपस्थितांचे आभार समितीचे अध्यक्ष बापूराव पाटील सोनारिकर यांनी मानले.


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !