Mon. Dec 23rd, 2024

बोरगाव सुधा येथे धाडसी चोरी;१ लाख ७५ हजाराचा मुद्देमाल चोरला

Spread the love

अंबुज प्रहार प्रतिनिधी

भोकर : तालुक्यातील मौ.बोरगाव सुधा येथे दि.२५ मे रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी घरात घुसून रोख १ लाख रुपये व अंदाजे ७५ हजार रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागीने चोरुन घरमालकांना मारहाण करुन पलायन केल्याची धाडची चोरीची घटना घडली असून या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध भोकर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक असे की,मौ.बोरगाव सुधा ता.भोकर येथील शेतकरी दत्ता होनाजी याटेवाड व त्यांची पत्नी हे जेवन करुन घरी झोपले असता दि.२५ मे २०२२ रोजी मध्यरात्री १२:१५ वाजताच्या सुमारास काळे कपडे परिधान केलेल्या काही अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला आणि कपाटातील ५०० रुपयाच्या २०० नोटा असे एकूण १ लाख रुपये,६ हजार रुपये किमतीच्या १० तोळे चांदीच्या दोन पाटल्या, ३० हजार रुपये किमतीचे ५० तोळे चांदीचे दोन वाळे,८ हजार रुपये किमतीचे १७ तोळे चांदीचे दंडकडे काढले. यावेळी याटेवाड यांच्या पत्नीस चोरांची चाहूल लागल्याने जाग आली व तीने आरडाओरड केली असता तिला चोरांनी मारहाण केली आणि तिच्या गळ्यातील ७ हजार रुपये किमतीचे सोन्याचे मनी मंगळसुत्र,६ हजार रुपये किमतीचे सोन्याचे कानातील दोन फुले काढून घेतली.ही ओरड ऐकून गावातील शोभाबाई दुबेवाड ही तेथे आली असता तिला ही मारहाण करुन तिच्या गळ्यातील ७ हजार रुपये किमतीचे अडीच ग्रॅम सोन्याचे मनी मंगळसुत्र व ७ हजार रुपये किमतीचे १५ तोळे चांदीचे काकन काढून घेतले,तसेच चुलत सून पार्वतीबाई हिच्या गळ्यातील ४ हजार रुपये किमतीचे सोन्याचे मनी मंगळसुत्र,असा एकूण १ लाख ७५ हजार रुपयाचा मुद्देमाल चोरुन या चोरट्यांनी पलायन केले.

याच बरोबर गावातील नागोराव कांबळे  बोरगावकर याचेही घर लुटण्याचा प्रयत्न केला.यावेळी देवराव अनपवाड व गावकरी तेथे गेले असता त्यांना ही चोरट्यांनी मारहाण केली व दगडफेक करत पलायन केले.ही माहिती भोकर पोलीसांना प्राप्त होताच प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड, पोलीस निरीक्षक विकास पाटील व अन्य पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली.गावक-यांच्या मते किमान ७ ते ८ चोर असावेत असे बोलल्या जात असून या धाडसी चोरीमुळे बोरगाव चे नागरिक भयभीत झाले आहेत.चोरांच्या शोधार्थ नांदेडहून श्वान पथकाचे पाचारण करण्यात आले होते.परंतू या पथकास चोरट्यांना शोधण्यात यश आले नाही.तर दता याटेवाड यानी दिलेल्या फिर्यादीवरून कलम ३९४ भादवि प्रमाणे अज्ञात चोरट्यांविरुद्ध भोकर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पो.नि.विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उप.नि. सुर्यकांत कांबळे हे पुढील अधिक तपास करीत आहेत.


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !