बोरगावच्या सरपंच पदी सौ.रायभोळे यांची बिनविरोध निवड
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : तालुक्यातील बोरगाव(सुधा) ग्रामपंचायत सरपंच पद हे अनुसूचित महिलेसाठी राखीव आहे.सदरील ग्रामपंचायतीत अनुसूचित जातीच्या दोन महिला एकाच पॅनल मधून निवडूण आल्या आहेत.पॅनल प्रमुख व सदस्यांनी या दोन महिला सदस्यांना प्रत्येकी अडीच वर्ष असे विभागून सरपंच पद द्यायचे ठरविले होते.त्या ठरावानुसार विद्यमान सरपंच सौ.आशाताई संतोष गागदे यांनी आपला कार्यकाळ पुर्ण केल्यामुळे सरपंच पदाचा रितसर राजीनामा दिला होता.त्यामुळे दि.८ नोव्हेंबर रोजी सदरील रिक्त सरपंच पदांची निवड प्रक्रिया घेण्यात आली असता केवळ एकच अर्ज असल्याने सौ.धम्मशिला दिलीप रायभोळे यांची सरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
ग्रामपंचायत कार्यालय बोरगाव(सुधा)येथे दि.८ नोव्हेंबर २०२३ रोजी नुतन सरपंच पदासाठी निवड प्रक्रिया घेण्यात आली. पीठासिन अधिकारी तथा मंडळ अधिकारी कंधारे,ग्रामसेवक सौ.नुनंचे यांच्या उपस्थितीत घेण्यात आलेल्या निवड प्रक्रियेत ठरल्याप्रमाणे सौ.धम्मशिला दिलीप रायभोळे यांचा सरपंच पदासाठी एकमेव अर्ज आल्यामुळे त्यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.यावेळी पोलीस जमादार भीमराव राठोड व पोलीस पाटील कापसे यांची देखील उपस्थिती होती.
याप्रसंगी पॅनल प्रमुख गीतेश बोटलेवाड,दत्ता दिगांबर सूर्यवंशी यांच्या समवेत उपसरपंच दत्तात्रय केदोबा दसरवाड,सदस्य, सुभाष दिगांबर पुरी,प्रदीप संभाजी जाधव सौ.कलावतीबाई लाला हुबेवाड,सौ.सविता बालाजी मुपरवाड,सौ वंदना उमेश पुरी,माजी सरपंच सौ. आशाताई संतोष गागदे,सौ.किसनाबाई शंकरराव लुंगारे,सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर पाटील लुंगारे, पुंडलिकराव कांबळे,माधव सूर्यवंशी,दिलीप रायभोळे,दत्ता सूर्यवंशी,शिवानंद शिंदे,संतोष गागदे,बंडू चिट्टेबोईवाड,उमेश पुरी,आनंद कांबळे,बाळू बोटलेवाड,बंडू कोंडापल्ले,मारोती हुबेवाड (माजी सरपंच )गोपीनाथ सूर्यवंशी,मारोती गंगाराम हुबेवाड व आदी प्रतिष्ठीत नारिकांची उपस्थिती होती.सर्व उपस्थितांनी नवनियुक्त सरपंच सौ.धम्मशिला दिलीप रायभोळे यांचा पुष्पहार घालून यथोचित सत्कार केला व अभिनंदनासह पुढील सेवाकार्यासाठी शुभेच्छा दिल्या.