Wed. Apr 16th, 2025

बोगस डॉक्टरवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या तालुका आरोग्य पथकावर केली दगडफेक

Spread the love

बोगस डॉक्टरच्या समर्थनार्थ सावरगाव मेट ता.भोकर येथील गावकरी डॉ.राहुल वाघमारे यांच्या वाहनापुढे झाले अडवे व त्या बोगस डॉक्टरची सुटका करुन घेत जप्त करण्यात आलेली औषधीही पळवली

उत्तम बाबळे,संपादक

भोकर : गोपनीय माहिती व काहींच्या तक्रारी प्राप्त झाल्यावरुन भोकर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राहुल वाघमारे हे सावरगाव मेट ता.भोकर येथील एका बोगस डॉक्टरवर कारवाई करण्यासाठी दि.२८ सप्टेंबर रोजी दुपारी त्या गावी गेले असता कोणतीही पदवी नसलेला सदरील बोगस डॉक्टर रुग्णावर उपचार करत असल्याचे निदर्शनास आल्यावरुन त्याच्या जवळील औषधी व उपचार साहित्य जप्त करुन कारवाईस्तव त्यास भोकर येथे घेऊन येत असतांना त्या बोगस डॉक्टरच्या समर्थनार्थ काही गावकऱ्यांनी तालुका आरोग्य अधिका-याचे वाहन अडविले व दगडफेक केली.तसेच जप्त करण्यात आलेली औषधी आणि साहित्य ही पळविले असून या गंभीर प्रकाराबाबत तालुका आरोग्य अधिकारी डॉ.राहुल वाघमारे यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी,तहसिलदार व पोलीस ठाणे भोकर येथे रितसर माहिती दिली आहे.यावरुन रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या त्या बोगस डॉक्टर विरुद्ध व वाहनावर दगडफेक करणाऱ्यांविरुद्ध काय कारवाई होणार ? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

तालुक्यातील सावरगाव मेट येथे एक बोगस डॉक्टर रुग्णांवर उपचार करत असल्याची माहिती मिळाल्यावरुन दि.२८ सप्टेंबर २०२२ रोजी  दिनांक २८/०९/२०२२ रोजी तालुकास्तरीय यंत्रणा तालुका आरोग्य अधिकारी डॉ.राहुल वाघमारे हे तेथे गेले असता बनियन टावेल परिधान केलेला हिमांशु मिश्रा विश्वास नावाचा एक व्यक्ती हा दोन रुग्णावर उपचार करत असताना आढळला. त्या पैकी एका व्यक्तीला आय.व्हि.लावण्यात आलेली आढळली.यावेळी हिमांशु मिश्रा विश्वास यांची चौकशी केली असता त्याने लेखी जबाब दिला आहे की,मी या गावात माघील ८ वर्षापासून लोकांवर ऑलोपॅथीचा उपचार करतो.तसेच त्याच्या जवळ ऑलोपॅथी औषधी पण आढळुन आल्या.त्यांची लाईनलिस्टींग करून मेडीसीन जप्त करून तालुका आरोग्य अधिकारी डॉ.राहुल वाघमारे व यंत्रणा परत निघाले असता गावातील अनेक लोकांनी त्यांचे चारचाकी वाहन अडविले व त्या वाहनावय दगडफेक केली.दगडफेक केल्यामुळे डॉ.राहुल वाघमारे यांनी ते वाहन थांबविले असता गावकरी लोकांनी त्यांना अश्लील शिविगाळ केली व वाहनातील जप्त केलेली औषधी जबरदस्ती हिसकावून घेत पळविली.तसेच त्या बोगस डॉक्टरच्या सुटकेसाठी वाहनाखाली आम्ही जीव देऊ अशी धमकी दिली व त्या बोगस डॉक्टरला त्या वाहनातून पळविले.दगडफेक,शिविगाळ व धमक्या गावकरी देत होते. त्यामुळे बोगस डॉक्टर विरुद्ध कारवाई करण्यासाठी गेलेल्या या पथकास जीव मुठीत धरुन रिकामे परतावे लागले.या पथकासोबत एक पोलीस जमादार ही होते.परंतू मोठ्या जमावापुढे ते काहीही करु शकले नाहीत.

झालेल्या या गंभीर प्रकाराबाबद तालुका आरोग्य अधिकारी डॉ.राहुल वाघमारे यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी,जि.प. नांदेड,तहसिलदार,तहसिल कार्यालय,भोकर,गट विकास अधिकारी,पंचायत समिती भोकर,पोलिस निरिक्षक,पोलिस ठाणे भोकर यांच्याकडे रितसर लेखी माहिती दिली आहे. अशा प्रकारचे बोगस डॉक्टर हे गरीब व गरजू रुग्णाच्या जिवित्वाशी खेळत असतांना त्यांच्या विरुद्ध कारवाई होणे अत्यंत गरजेचे आहे.परंतू भावनिक नागरिक जर त्यांचे समर्थन करत असतील तर अनुचित प्रकार होणारच यात शंका नाही.त्यामुळे अशा प्रकारच्या बोगस डॉक्टरांविरुद्ध कारवाई व्हायलाच पाहिजे.पाहुयात की,वरीष्ठ अधिकारी व पोलीस काय कारवाई करतील ते.


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !