Sun. Dec 22nd, 2024

बी.आर.पांचाळ यांना प्रबोधनकार ठाकरे युवा पत्रकारिता पुरस्कार जाहीर

Spread the love

कै.दुर्गादास सराफ प्रतिष्ठान व हिंदवी बाणा च्या वतीने हा पुरस्कार देऊन होणार आहे सन्मान

अंबुज प्रहार प्रतिनिधी

भोकर : हिंदवी बाणा लाईव्ह च्या वर्धापन दिना निमित्त कंधार येथील कै.दुर्गादास सराफ प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा प्रबोधनकार ठाकरे युवा पत्रकारिता पुरस्कार भोकर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष तथा दै.देशोन्नतीचे तालुका प्रतिनिधी बी.आर.पांचाळ यांना घोषित झाला आहे.

कंधार येथील कै.दुर्गादास सराफ प्रतिष्ठान च्या वतीने हिंदवी बाणा लाईव्ह च्या वर्धापन दिना निमित्त दरवर्षी पत्रकारांना विविध पुरस्कार देऊन दर्पण दिना निमित्त सन्मानित करण्यात येते.चालू वर्षीचा राज्यस्तरीय पुरस्कार लोकशाही न्यूज चे वृत्तनिवेदक ऋषी देसाई यांना घोषित झाला आहे. तर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील पत्रकारानानाही पुरस्कार देऊन सन्मानिर करण्यात येणार आहे.या पुरस्कारार्थी सन्माननियात भोकर येथील मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष बी.आर.पांचाळ यांना प्रबोधनकार ठाकरे युवा पत्रकारिता पुरस्कार घोषित झाला आहे.विकासात्मक पत्रकारिता तसेच सर्वसामान्यांच्या अडी-अडचणी परखडपणे मांडून सामाजिक लिखाण केले,वृक्षारोपण,जलसंधारण, ग्रामस्वच्छता अभियान,महिलांचे विविध प्रश्न,व्यसनमुक्ती, शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी अशा बहुआयामी पत्रकारितेच्या योगदानाची दखल घेऊन बी. आर.पांचाळ यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.यापुर्वीही त्यांना शासनाचे विविध पुरस्कार,तसेच सेवाभावी राज्यस्तरीय पुरस्कार,सामाजिक पुरस्कार मिळाले आहेत.त्यात अजून एक भर पडली असल्याने नुकताच घोषित झालेल्या पुरस्कारा बद्दल विविध मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

🌹🌸🌹🌹🌸🌹🌹🌸🌹

संपादक उत्तम बाबळे व अंबुज प्रहार परिवाराच्या वतीने देखील त्यांचे अगदी मनापासून हार्दिक अभिनंदन व भावी सेवाकार्यासाठी शुभेच्छा!


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !