प्रबोधनकार ठाकरे युवा पत्रकारिता पुरस्काराने बी.आर.पांचाळ सन्मानित
ना.अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते झाला कै.दुर्गादास सराफ प्रतिष्ठानचा हा पुरस्कार प्रदान
अंबुज प्रहार प्रतिनिधी
कंधार : निर्भीड,परखड,सामाजिक लिखाण करून अन्यायाला वाचा फोडणारे भोकर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार बी.आर.पांचाळ यांना कंधार येथील कै.दुर्गादास सराफ पत्रकार प्रतिष्ठान व हिंदवी बाणा च्या वतीने देण्यात येणारा प्रबोधनकार ठाकरे युवा पत्रकारीता पुरस्कार राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते देऊन दि.३० एप्रिल रोजी सन्मानित आले कंधार येथील हिंदवी बाणा लाईव्ह व कै.दुर्गादास सराफ पत्रकार प्रतिष्ठान यांच्या वतीने २०२१ चा पुरस्कार वितरण सोहळा दि.३० एप्रिल २०२२ रोजी संत नामदेव महाराज मंगल कार्यालय कंधार येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
यावेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या शुभहस्ते राज्यस्तरीय, मराठवाडास्तरीय व जिल्हास्तरीय पुरस्काराचे वितरण यावेळी करण्यात आले.भोकर येथील दैनिक देशोन्नती चे तालुका प्रतिनिधी तथा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष बी. आर.पांचाळ यांना सन्मानचिन्ह,प्रशस्तीपत्र,शॉल, पुष्पहार देऊन प्रबोधनकार ठाकरे युवा पत्रकारीता पुरस्कारने देऊन सन्मानित करण्यात आले.
सदरील पुरस्कार वितरण सोहळ्यास मठाधीश एकनाथ महाराज,शिवा संघटनेचे प्रांताध्यक्ष प्रा.मनोहर धोंडे, आमदार अमरनाथ राजूरकर,आमदार मोहन अण्णा हंबर्डे,गोविंदराव शिंदे नागेलीकर,माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे,ईश्वरराव भोसीकर,अरविंद नळगे, ऋषी देसाई मुंबई,संतोष पांडागळे,अनिल मोरे,बालाजी पंडागळे,एकनाथ पवार,संपादक माधव भालेराव यांसह आदी मान्यवरांची उपस्थिती होती.