पिडीत कुटूंबियांना आर्थिक मदतीने इंजि. विश्वंभर पवार यांचा वाढदिवस होणार साजरा
विज पडून नैसर्गिक आपत्तीने मृत्यू झालेल्या मयतांच्या पिडीत कुटूंबियांना करण्यात येणार आहे प्रत्येकी ५ हजार रुपयाची आर्थिक मदत
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे भोकर तालुकाध्यक्ष इंजि.विश्वंभर पवार हे एक सेवाभावी व्यक्तीमत्व म्हणून सर्व परिचित आहेत.त्यांच्या वाढदिवसानिमित्त प्रतिवर्षी अनेक सेवाभावी लोकोपयोगी उपक्रम राबविले जातात.याच अनुषंगाने दि.३ जानेवारी रोजी भोकर तालुक्यातील नैसर्गिक आपत्तीने मृत्यू झालेल्या पिडीत शेतकरी कुटूंबियांना इंजि.विश्वंभर पवार मित्र मंडळाच्या वतीने आर्थिक मदत करण्यात येऊन त्यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे भोकर तालुकाध्यक्ष तथा मराठवाडा जनता विकास परिषदेचे भोकर तालुकाध्यक्ष इंजि.विश्वंभर पवार यांच्या वाढदिवसानिमित्त प्रतिवर्षी अनेक सेवाभावी कार्यक्रम व उपक्रम राबविले जातात. गरजू व होतकरूना शालेय साहित्य,औषधी,कपडे यांसह आदी वस्तूंचे वाटप करण्यात आले.रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिर ही घेण्यात आले.तसेच विविध प्रकारे आपत्तीने मृत्यू झालेल्या पिडीत कुटूंबियांना आर्थिक मदत करण्यात आली.यावर्षी देखील याच प्रकारे इंजि. विश्वंभर पवार मित्र मंडळाच्या वतीने सेवाभावी लोकोपयोगी उपक्रम राबविण्यात येणार असून सन २०२२ मध्ये भोकर तालुक्यातील विज पडून नैसर्गिक आपत्तीने मृत्यू झालेल्या सहा शेतकऱ्यांच्या व पुरात वाहून गेल्याने मृत्यू झालेल्या एका शेतकऱ्याच्या अशा एकूण ७ पिडीत कुटूंबियांना प्रत्येकी ५ हजार रुपयाची आर्थिक मदत करण्यात येणार आहे.या समाजसेवी लोकोपयोगी उपक्रमाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अनेक पदाधिकारी,कार्यकर्ते व मित्र मंडळीच्या उपस्थितीत इंजि.विश्वंभर पवार यांचा दि.३ जानेवारी २०२२ रोजी मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे.अशी माहिती विश्वंभर पवार मित्र मंडळाने दिली आहे.
वाढदिवसानिमित्त इजि.विश्वंभर यांना उत्तम आरोग्य व उदंड आयुष्यासाठी अनंत मंगल कामना! – संपादक उत्तम बाबळे