पिंपळढव येथे डॉ.अण्णा भाऊ साठे यांचा जयंती सोहळा उत्साहात साजरा

अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : तालुक्यातील मौ.पिंपळढव येथे साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.अण्णा भाऊ साठे यांचा १०३ वा जयंती सोहळा ध्वजारोहण,जाहीर सभा व भव्य मिरवणूक यासह आदी कार्यक्रमांनी दि.२० ऑगस्ट रोजी उत्साहात संपन्न झाला.

विश्व साहित्य भुषण साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.अण्णा भाऊ साठे यांच्या १०३ व्या जयंती निमित्त मौ. पिंपळढव ता.भोकर येथे नियोजित पुतळ्याच्या ठिकाणी तळ हातावर पृथ्वी असलेल्या लाल ध्वजाचे रोहण सरपंच प्रतिनिधी मारोतराव भोंबे यांच्या हस्ते सकाळी ठिक ११:०० वाजता निमंत्रित मान्यवर, समाज बांधव व गावकऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.यानंतर त्याच ठिकाणी जाहीर सभा घेण्यात आली.या सभेच्या अध्यक्षस्थानी अण्णा भाऊ साठे क्रांती आंदोलन, महाराष्ट्र राज्य चे प्रदेशाध्यक्ष संपादक उत्तम बाबळे हे होते.तर प्रमुख वक्ते म्हणून लसाकम चे कोषाध्यक्ष पांडूरंग दाडेराव हे होते.तसेच प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते नामदेव वाघमारे, बहुजन रयत परिषदेचे नांदेड जिल्हाध्यक्ष साहेबराव गुंडीले,लसाकम चे नांदेड जिल्हा उपाध्यक्ष बालाप्रसाद भालेराव,किरण गोईनवाड सर,जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे आनंदा गाडगेराव,सामाजिक युवा कार्यकर्ते शिवकुमार गाडेकर,मानवहित लोकशाही पक्षाचे युवक नेते गजानन गाडेकर,केरबाजी देवकांबळे,अनिल डोईफोडे,पिंपळढव सेवा सहकारी सोसायटी चे चेअरमन प्रल्हाद जाधव यांसह आदींची उपस्थिती होती.

यावेळी प्रमुख वक्ते व उपस्थित मान्यवरांनी साहित्यरत्न डॉ.अण्णा भाऊ साठे यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला.कु.रुपाली मांजरे या शाळकरी मुलीने केलेले अभ्यासपूर्ण भाषण सर्वांचे आकर्षण ठरले.तर अध्यक्षीय समारोप संपादक उत्तम बाबळे यांनी केला.सभेचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन विठ्ठल टिळेकर यांनी केले.तसेच जयंती सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी जयंती मंडळाचे अध्यक्ष सिद्राम मरीबा जलधारे,उपाध्यक्ष दर्शन चांदू टिळेकर,चांदू हरी कंधारे, शंकर जलधारे,मनोज मांजरे,नागेश गायकवाड,माधव पुंजेकर,मारोती उदगीरे,अरविंद मोरे,बाबूराव धाडेक, पोलीस पाटील शिवानंद गायकवाड यांसह आदींनी परिश्रम घेतले.सभेच्या सांगते नंतर साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.अण्णा भाऊ साठे यांच्या तैलचित्राची भव्य मिरवणूक गावातील मुख्य रस्त्याने काढण्यात आली.जयंती सोहळ्या निमित्त उत्साहात संपन्न झालेले ध्वजारोहण,जाहीर सभा व भव्य मिरवणूक यांसह आदी कार्यक्रमात डॉ.अण्णा भाऊ साठे प्रेमी,विचार अनुयायी, समाज बांधव व गावकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

