पाळज येथे आमचा गाव आमचा विकास अभियान कार्यशाळा संपन्न
भोकर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अमित राठोड यांच्या हस्ते या अभियान कार्यशाळेचे झाले उद्घाटन
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : महाराष्ट्र शासना तर्फे आमचा गाव आमचा विकास राष्ट्रीय ग्रामस्वराज अभियान राबविले जात असून याच अनुषंगाने श्री तीर्थक्षेत्र पाळज ता.भोकर येथील श्री गणेश मंदीर मंगल कार्यालयात दि.२० जानेवारी रोजी घेण्यात आलेल्या सदरील अभियानांतर्गत गणस्तरीय कार्यशाळा सन २०२३-२४ चे उद्घाटन भोकर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी अमित राठोड यांच्या हस्ते करण्यात आले.
सदरील कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी पाळज ग्रामपंचायतीचे उपसरपंच सुभाष चटलावार हे होते.तर उद्घाटक तथा प्रमुख मार्गदर्शक म्हणून गटविकास अधिकारी अमित राठोड यांची उपस्थिती होती.तसेच पंचायत समिती विस्तार अधिकारी एस.आर.कांबळे, पाळजचे ग्रामविकास अधिकारी बालाजी एम.इंगळे, जि.प.हायस्कूल पाळजचे मुख्याध्यापक पत्तेवार यांची प्रमुख उपस्थिती होती.मुख्याद्यापक व शिक्षकांनी उपस्थित मान्यवरांचा सत्कार केला.
संपन्न झालेल्या कार्यशाळेत मार्गदर्शक म्हणून बोलतांना गटविकास अधिकारी अमित राठोड यांनी जीपीडिपी आराखड्या बाबद सविस्तर माहिती दिली. तसेच बंधीत व अबंधीत क्षेत्रावर काम करीत असताना नऊ थीमला न्याय कसा देता येईल आणि गावाचा उत्कर्ष कसा करता येईल याविषयी देखील सविस्तर मार्गदर्शन केले.याच बरोबर शाळेसाठी सायन्स वॉल, अस्ट्रॉनॉमी क्लब,बायनुकूलर या अभियानातून पुरवण्यात यावेत यासाठीच्या सूचना दिल्या.
या कार्यशाळेस अनुसरुन प्रास्ताविक ग्रामसेवक संघटनेचे जिल्हा सचिव बी.के..पाटील केले.तर सुत्रसंचालन पंडित तोटेवाड यांनी केले आणि उपस्थितांचे आभार हनुमंत काऊलवार यांनी मानले. संपन्न झालेल्या कार्यशाळेसाठी पाळज गटातील ग्रामपंचायतींचे सर्व सरपंच,उपसरपंच,ग्रापंचायत सदस्य,ग्रामसेवक,अंगणवाडी सेविका,गटातील सर्व शाळेचे मुख्याध्यापक,गटातील पंचायत समिती अधिकारी व कर्मचारी यांसह आदींची बहुसंख्येने उपस्थिती होती.