Mon. Dec 23rd, 2024

पत्रकार शशिकांत वारिशे यांची हत्त्या करणाऱ्यास कठोर शिक्षा द्यावी

Spread the love

मुख्यमंत्री व गृहमंत्री यांच्याकडे भोकर येथील पत्रकार बांधवांनी केली मागणी

अंबुज प्रहार प्रतिनिधी

भोकर : रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारिशे यांची गेल्या आठ दिवसांपुर्वी निर्घुण हत्त्या करण्यात आली आहे. या अमानुष घटनेचा भोकर जि.नांदेड येथील पत्रकार बांधवांनी तीव्र जाहीर निषेध व्यक्त केला असून ‘त्या’ मारेकऱ्यांना कठोरातील कठोर शिक्षा करण्यात यावी व यांसह आदी मागण्यांचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दि.१० फेब्रुवारी रोजी प्र.भोकर उपविभागीय अधिकारी सुजित नरहरे यांच्या मार्फत पाठविण्यात आले आहे.

राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारिशे यांनी रिफायनरी विरोधात बातमी लिहल्याने त्याचा राग मनात धरून पंढरीनाथ अंबेरकर यांनी वारिशे यांच्या दुचाकीला आपल्या कारने धडक देवून त्यांची निर्घुण हत्या केली आहे.तसेच केज,मुखेड,धुळे आदी ठिकाणी पत्रकारांवर हल्ले करण्यात आली व काही जणांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.या अमानुष घटनांचा व खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यांचा संबंध राज्यात तीव्र जाहीर निषेध व्यक्त करण्यात येत आहे. याच अनुषंगाने भोकर जि.नांदेड येथील भोकर तालुका मराठी पत्रकार संघ व प्रेस संपादक तथा पत्रकार सेवा संघाच्या वतीने पत्रकार बांधवांनी दि.१० फेब्रुवारी २०२३ रोजी तीव्र जाहीर निषेध व्यक्त केला आहे.तसेच पत्रकार शशिकांत वारिशे यांची हत्त्या करणाऱ्या गुन्हेगारांना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी यासाठी पोलीसांनी योग्य तपास करावा व हा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात यावा.शासनाने पिडीत पत्रकार बांधवांच्या कुटूंबियांना संरक्षण देऊन तात्काळ आर्थिक मदत करावी.यांसह आदी मागण्यांचे निवेदन प्र.भोकर उपविभागीय अधिकारी सुजित नरहरे यांच्या मार्फत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांना पाठविण्यात आले आहे.तसेच भोकर चे तहसिलदार राजेश लांडगे व पो.नि.विकास पाटील यांना ही सदरील निवेदनाच्या प्रतिलीपी देण्यात आल्या आहेत.

सदरील निवेदन देण्यात आलेल्या शिष्टमंडळात भोकर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संपादक उत्तम बाबळे,पदाधिकारी बालाजी नार्लेवाड,गंगाधर पडवळे,आर.के.कदम,विजय चिंतावार,कमलाकर बरकमकर,सुधांशू कांबळे, विठ्ठल सुरलेकर व प्रेस संपादक तथा पत्रकार सेवा संघाचे अध्यक्ष उत्तम कसबे,पदाधिकारी सुभाष नाईक,दत्ता बोईनवाड यांसह आदी पत्रकार बांधवांचा समावेश होता.


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !