निवृत्त वन अधिकारी हाजी इलियास खान इनामदार यांचे अल्पशः आजाराने निधन
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे भोकर शहराध्यक्ष डॉ. फेरोज खान इनामदार यांना पितृ शोक
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भोकर शहराध्यक्ष डॉ. फेरोज खान इनामदार यांचे वडील निवृत्त वनपरिक्षेत्र अधिकारी हाजी इलियास खान इनामदार(७२) रा. इनामदार गल्ली भोकर यांचे बुधवार,दि.१४ सप्टेंबर २०२२ रोजी सायंकाळी ६:०० वाजताच्या दरम्यान नांदेड येथील एका खासगी रुग्णालयात उपचारा दरम्यान अल्पशःआजारात दु:खद निधन झाले आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी,२ मुले,१ मुलगी,सुना,जावई, नातवंडे असा मोठा परिवार असून उद्या गुरुवार,दि.१५ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी १०:०० वाजता नमाजे जनाजा जामा मजिद,भोकर येथे अदा करुन त्यांंच्या अबाई कब्रस्तान,तहसिल कार्यालया समोर भोकर येथे दफनविधी करण्यात येणार आहे.
इनामदार परिवाराच्या दु:खात संपादक उत्तम बाबळे व अंबुज प्रहार परिवार सहभागी असून त्यांना विनम्र भावपुर्ण श्रद्धांजली !