Mon. Dec 23rd, 2024
Spread the love

लेखिका सौ.रुचिरा बेटकर यांचा प्रासंगिक विशेष लेख!
अंबुज प्रहार विशेष

सरत्या वर्षात असतानाच,सुटून जाणाऱ्या या मागील वर्षाला आणि येणाऱ्या नव्या वर्षाला संपूर्ण पणे मी एकदाचे डोळ्यात सामावून घेतले.चालू वर्ष  हे माझ्यासाठी चांगले गेले.असं न म्हणता ते मी खूप  चांगल्याप्रकारे घालवले आहे.असं मी म्हणेल…चालू वर्षात बऱ्याच स्वप्नांची पूर्तता झाली.पण त्याला पुर्णत्वाचं रूप हे येणाऱ्या नव्या वर्षातच पाहायला मिळेल.अनेक सुख-दु:खाच्या चटक्यांसह माझ्या आयुष्याला एक वेगळीच कलाटणी मिळाली आहे.

     या सरत्या वर्षात अचानक पणे,अजाणपणे,खूप काही आशा गोष्टी घडल्या आहेत की,त्याने मी अति भारावून गेले आहे.कोणाची तरी साथ ही खूप आपुलकीची आणि आलाददायक वाटणं हे एक आश्चर्य आणि काल्पनिक विश्वात वावरण्यासारखंच आहे.न मागून ही बरच काही पदरात येऊन पडणं आणि त्यामुळे माझी फाटकी झोळी ही लाखमोलाची होणं हे एक नवलच आहे.
     ईच्छा,आकांक्षा,आपेक्षा यांना ही पलीकडे सारून अनपेक्षित पणे ते सर्व काही मला या सरत्या वर्षात  मिळालं आहे.
सरत्या वर्षाच्या संध्येतुन,नव्या वर्षाच्या पुर्वेला माझ्या आयुष्याचा जन्म होणार आहे की,काय असच काहीस वाटत आहे…

 सरत्या वर्षान खूप काही भरभरून मला दिलं आहे…आपली माणसं,स्वप्नाना पूर्ण करण्यासाठीच बळ…आणि स्वछंदपणे उंच गरूड झेप घेण्यासाठी नवपंख जणू दिले आहेत.
बंधात वावरत असताना मुक्त पणे आप-आपल्यात कसं जगता येईल याचा ध्यास दिला आहे…डोळ्यात नवस्वप्नाना पेलण्याचा विश्वास दिला आहे.
“ईच्छा तिथे मार्ग”…या मणीला सार्थ करणारा…आत्मविश्वास हि दिला….याचबरोबर पुर्ण न होवू शकणाऱ्या महत्वकांक्षाची डोळ्यात ओल ही दिली आहे.
    आता,या पुढच्या नववर्षात कितपत उंच उडता येईल याची जय्यत तयारी मनोमनी केली आहे.आणि त्यासाठी जिद्दीची गाठ ऊरी बाळगून ठेवली आहे.
    “सरत्याच्या आठवणी डोळ्यात ओल देऊन जातात अन् जाता जाता प्रत्येक क्षणाचा मोल ठरवून जातात.”
ते ही अमूल्य असं…म्हणूनच सारा येणारा काळ…हा डोळ्यात एकवटून घेतला आहे.काय होईल,कसे होईल,कधी होईल आणि किती होईल ? याची तमा न करता…आयुष्यातला प्रत्येक एक एक क्षण अस्वाद घेत उगाळून प्यायचा आहे. येणारा प्रत्येक दिवस स्वतः साठीच जगायचा आहे… प्रत्येक महिण्याच्या शेवटी कमी जास्तीचा हिशोब मांडायचा आहे. वाटेत येणाऱ्या आडचणीला हसत खेळत मिठीत घ्यायचं आहे.
डोळे मिटुन,हात पसरुन माझ्या आयुष्यात येणाऱ्या नवपर्वाला मला कवेत घ्यायचे आहे.आता प्रतिक्षा आहे फक्त त्या नवपर्वातल्या नव सोनेरी किरणांची…जे माझ्या आयुष्याला सुवर्णमय करेलं…अन् सोनसळी सारखी झळाळी देईल…अशी आशा स्वप्नानी डोळ्यांशी आणि  आपल्या जीवंत मनाशी ठेवली आहे…!
सौ.रूचिरा बेटकर
लेखिका,नांदेड
९९७०७७४२११


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !