ना.अशोक चव्हाण यांच्या हस्ते सावरगाव माळ युवक काँग्रेस शाखा फलकाचे झाले अनावरण
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : राज्याचे सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण हे विकासात्मक कामांच्या भुमिपूजन व लोकार्पण सोहळ्या निमित्ताने दि.२२ जानेवारी रोजी भोकर तालुका दौऱ्यावर आले असता त्यांच्या हस्ते तालुक्यातील मौ.सावरगाव माळ युवक काँग्रेस शाखेच्या फलकाचे अनावरण करण्यात आले.
काँग्रेस पक्ष सक्षमीकरणासाठी “गाव तिथे युवक काँग्रेस शाखा” स्थापन करण्यात येत असून भोकर विधानसभा युवक काँग्रेस शाखेच्या वतीने मौ.सावरगाव माळ येथे युवक काँग्रेस शाखेची निवड नुकतीच करण्यात आली आहे. सदरील शाखेच्या गाव फलकाचे ना.अशोक चव्हाण यांच्या हस्ते दि.२२ जानेवारी २०२२ रोजी अनावरण करण्यात आले.यावेळी नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, जिल्हा परिषदेचे सभापती बाळासाहेब पाटील रावणगावकर,भोकर काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष तथा सभापती जगदीश पाटील भोसीकर,युवक काँग्रेस भोकर विधानसभा अध्यक्ष मदन भाऊ देशमुख, संचालक रामचंद्र मुसळे,भोकर विधानसभा युवक काँग्रेस सरचिटणीस विनोद चव्हाण,महासचिव गोविंद मेटकर, सरचिटणीस विकास क्षिरसागर,राजू पाटील दिवशीकर, मारुती किरकन,अविनाश कस्तुरे,राजू हाके यांसह गाव शाखेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.