Mon. Dec 23rd, 2024
Spread the love

नाताळ सणानिमित्त लेखिका रुचिरा बेटकर यांचा विशेष लेख

अंबुज प्रहार विशेष 

‘नाताळ’
वर्षाचा शेवटचा महिना म्हणजे डिसेंबर,एकीकडे नाताळ सणाची लगबग तर दुसरीकडे ३१ डिसेंबर आणि नवीन वर्षाची चाहूल…
सर्वसाधारणपणे सर्वच धर्मात “जिथं अन्यायचा कहर होतो तिथे प्रत्यक्ष देवाला अवतार घ्यावा लागतो” अशा आशयाचीच कथा असते.जसे हिंदू पौराणिक कथेमध्ये श्रीकृष्णाच्या जन्माचे कारण पण कंसाच्या छळाला कंटाळलेल्या रयतेचे रक्षण करण्यासाठी असेच नमुद केलेले आपणास वाचावयास मिळते. तसेच येशूचा जन्म ही झाला आहे,असे ख्रिस्ती बांधव सांगताना दिसतात.या तारणकर्त्या येशूचा जन्माचा उत्सव म्हणजेच नाताळच्या सण असे आपण म्हणू शकतो.
 २५ डिसेंबर रोजी जगभरात अत्यंत उत्साहात नाताळ हा सण साजरा केला जातो.यालाच ख्रिसमस असे ही म्हणतात.या निमित्ताने लहान मुले सांताक्लॉजची आतुरतेने वाट पाहतात. सांताक्लॉज म्हणजे लाल आणि पांढरा पोशाख केलेला सांताक्लॉज होय.हे एक पौराणिक जाडजुड असं पात्र आहे.जो रेनडियरवर स्वार होतो आणि लहान मुलांसाठी चॉकलेट, भेटवस्तू आणतो. प्रभू येशू ख्रिस्त आणि सांताक्लॉज यांच्या जन्माचा काही विशेष संबंध नाही.सांताक्लॉजची वाट पाहण्याची प्रथा चौथ्या शतकापासून सुरू झाली आहे.सेंट निकोलस यांच्या उदारपणाची एक अतिशय प्रसिद्ध कहाणी आहे.निकोलस यांना मदत करण्याचा छंद होता.ते कायमच गरिबांना मदत करत.एकदा त्यांनी एका गरीब माणसाला मदत केली होती.त्यावेळी,संत निकोलसने छुप्या पद्धतीने त्या तीन मुलींच्या मोज्यांमध्ये सोन्याच्या नाण्यांची पिशवी ठेवली आणि त्यांना या समस्येतून सुखरूप सोडवले.तेव्हापासून ख्रिसमसच्या रात्री भेटवस्तू मिळण्याच्या आशेने लहान मुले घराबाहेर किंवा खिडकीत मोजे टांगतात.अश्या प्रकारे निकोलसने अनेकांना मदत केली.काही काळ लोटल्यावर लोकांना हे सर्व निकोलस करतोय याबाबत कळालं.तेव्हांपासुन लोक त्याला सेन्ट निकोलस असे म्हणुं लागले.सॅन्ट निकोलस हळूहळू सांताक्लाॅज नावाने प्रसिध्द झाला.या कथेला आधार मानत त्याला फादर ख्रिसमस आणि ओल्ड मॅन ख्रिसमस असे नाव देण्यात आले.यानंतर ख्रिसमसच्या दिवशी सॉक्समध्ये भेटवस्तू देण्याची म्हणजेच सिक्रेट सांता बनण्याची प्रथा जगभर सुरू झाली.यामुळे ख्रिसमसच्या दिवशी अनेक लोक लहान मुलांना किंवा अनाथ मुलांना सांताक्लॉज बनून गिफ्ट देतात…सांताक्लाॅजने भेटवस्तू दिल्यामुळे लहान मुलं खूप खूश होतात.सांताक्लाॅजबद्दल प्रत्येकाच्या मनात एक कुतुहल पहायला मिळत.सांताक्लाॅज स्वर्गातुन येतो आणि येतांना प्रत्येकाच्या आवडीच्या गोष्टी आणतो असा एक समज आहे. त्यामुळेच हल्ली भेटवस्तू देण्याच्या प्रथेला ही जोर आला आहे. सध्या ऑफिसमध्ये किंवा इतरत्र ही भेटवस्तू देण्याच्या कार्यक्रमाला जोर धरला आहे.पुढे संत निकोलस मोठा झाल्यावर ख्रिस्ती धर्माचा धर्मगुरू बनला.

नाताळ च्या दिवशी ख्रिसमस ट्री ला ही खूप महत्त्व प्राप्त झाले आहे.कारण ख्रिसमस ट्री हे शाश्वत जीवनाचे प्रतीक मानले जाते.आणि अमरत्व दर्शवते. सकारात्मकतेचे प्रतिनिधित्व ते झाड करते.असे मानले जाते की ख्रिसमस ट्री ठेवण्याची परंपरा पहिल्यांदा जर्मनीमध्ये सुरू झाली.
ख्रिसमस ट्री मुळे हिवाळ्याच्या ऋतूतील निर्विकार, निस्तेज आणि उदास हवामानात आनंदीपणा, सकारात्मकता आणि आशावादाची भावना येते.खडतर हवामान असूनही हार न मानण्याची आणि हिरवेगार राहण्याची ख्रिसमस ट्री ची भावना सकारात्मकता दर्शवते.तसेच,या सदाबहार झाडांपासून येणारा गोड सुगंध तुम्हाला दररोजच्या तणावापासून मुक्त करण्यास आणि आराम देण्यास मदत करतो.
सण,उत्सव कोणताही असो तो सण तुम्हाला ठराविक मर्यादेपर्यंत प्रोत्साहित करतात,तुम्ही एक्स्चेंज करत असलेले गिफ्ट सुखद व मनोरंजन निर्माण करतात.
सर्वांना नाताळ सणाच्या हार्दिक शुभेच्छा!

लेखिका रुचिरा बेटकर,नांदेड 
९९७०७७४२११


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !