Wed. Apr 16th, 2025

नांदेड मधील भुखंडावर अनाधिकृतपणे ताबा मिळविण्याचा प्रयत्न करणारे ‘ते’ अद्यापही मोकाटच

Spread the love

एका महिलेच्या भुखंडावर अनाधिकृतपणे ताबा मिळविण्याचा प्रयत्न करणाऱ्या ‘त्या’ तिघांचा जामीन मा.न्यायालयाने नाकारला

गुन्हा दाखल होऊनही ‘ते’ अटक होत नसल्याने सदरील असहाय्य महिला वावरतेय प्रचंड दहशतीखाली

अंबुज प्रहार प्रतिनिधी

नांदेड : एमआयडीसी,नांदेड भागातील एका भूखंडावर अनाधिकृतपणे ताबा मिळविण्याच्या प्रयत्न करणाऱ्या काही जणांवर नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात दि.२१ फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.या प्रकरणातील रमेश पारसेवार,कृष्णा शुक्ला आणि संग्राम राणे या तिघांनी मा.नांदेड न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता.परंतू गुन्ह्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन न्यायमुर्ती एस.ई.बांगर यांनी त्यांचा अर्ज फेटाळून लावला असून सदरील लोक अद्यापही अटक न झाल्याने ती असह्य महिला प्रचंड दहशतीखाली आहे.तर यामुळे तिच्या जीवित्वास धोका निर्माण झाल्याने त्यांना त्वरीत अटक करण्यात यावी अशी मागणी या महिलेने पत्रकार परिषदेद्वारे केली आहे.

बातमी – युट्यूब लिंक व्हिडिओ…

कमल पत्रावळी रा.नांदेड यांच्या मालकीचा भुखंड एमआयडीसी नांदेड येथे आहे.त्या भूखंडावरील १५ हजार स्क्वेअर फूट जागेवर १० ते १२ जणांनी अनधिकृतपणे ताबा मिळविण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी दि.२१ फेब्रुवारी २०२३ रोजी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात रामजनत बहादूर मंडळ, पांडुरंग बालाजी नळगे, संग्राम राणे,रमेश विश्वंभर पारसेवार आणि कृष्णा राजेंद्र शुक्ला यांच्यासह १० ते १५ जणांच्या नावे तक्रार देण्यात आली होती. यावरुन गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास पो.नि.अशोक घोरबांड यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उप.नि.आनंद बिचेवार हे करीत आहेत.

दरम्यानच्या काळात रमेश पारसेवार,कृष्णा शुक्ला आणि संग्राम राणे या तिघांनी मा.नांदेड न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता.परंतू सदरील गुन्ह्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन शुक्रवार दि.१० मार्च २०२३ रोजी न्यायमुर्ती एस.ई. बांगर यांनी त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावत जामीन नाकारला आहे.कमल पत्रावळी यांच्या वतीने ॲड.सय्यद अरीबोद्दीन यांनी काम पाहिले आहे.

गुन्हा दाखल होऊनही ‘ते’ अटक होत नसल्याने सदरील असहाय्य महिला वावरतेय प्रचंड दहशतीखाली

कमल पत्रावळी या महिलेच्या भुखंडावर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यावर गुन्हा दाखल होऊनही ‘ते’ आरोपी पोलीसांना अद्यापही सापडत नाहीत. सदरील महिलेच्या वडील व दोन भावांचा अकाली मृत्यू झाल्यामुळे ती त्या कुटूंबातील एकटी कर्ती महिला असून तिच्यावरच कुटूंबाची सर्व जबाबदारी आहे.ही असहाय्य महिला एकटी असल्याचे पाहून उपरोक्त भूखंड माफियांनी तिच्या भुखंडावर अनाधिकृतपणे ताबा घेण्याचा प्रयत्न केला.सुदैवाने हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याने पोलीसांत गुन्हा नोंद झालाय. यावेळी तिच्यावर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न ही झाला होता.गुन्हा नोंद होऊनही ‘ते’ लोक तेंव्हापासून अटकपुर्व जामीन नाकाच्या पर्यंत ही मोकाटच असल्याने सदरील महिला व तिचे कुटूंब प्रचंड दहशतीच्या खाली वावरत असून त्यांच्या जीवित्वास धोका निर्माण झाला असल्याने त्या मोकाट लोकांना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी पत्रकार परिषदेतून या महिलेने केली आहे.तर सदरील आरोपींपैकी एकास जामीन मिळाला असून अन्य तिघांचा अटकपुर्व जामीन मा.न्यायालयाने नाकारला आहे.त्या सर्वांना लवकरच अटक करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत अशी माहिती ग्रामीण पोलीस ठाणे नांदेडचे तपासणीक अधिकारी पो.नि.अशोक घोरबांड यांनी दिली आहे.


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !