नांदेड जिल्हा तेंग सु डो कोरियन कराटे संघ राज्यस्तरीय स्पर्धेसाठी रवाना
आत्मा मलिक एज्युकेशन अॅन्ड स्पोर्ट्स डिपार्टमेंट कोकमठाण,शिर्डी जि.अहमदनगर येथे होत आहे ही ९ वी राज्यस्तरीय तेंग सु डो कोरियन कराटे अजिंक्यपद स्पर्धा
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : आत्मा मलिक एज्युकेशन अॅन्ड स्पोर्ट्स डिपार्टमेंट कोकमठाण,शिर्डी जि.अहमदनगर येथे होत असलेल्या राज्यस्तरीय तेंग सु डो कोरियन कराटे अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नांदेड जिल्ह्याचा पात्र संघ भोकर येथून रवाना झाला असून खेळाडूंना यशासाठी अनेक मान्वर व पालकांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
नांदेड जिल्ह्यातील निवड झालेल्या पात्र खेळाडूंचा जिल्हा संघ आत्मा मलिक एज्युकेशन अॅन्ड स्पोर्ट्स डिपार्टमेंट कोकमठाण,शिर्डी जि.अहमदनगर येथे होत असलेल्या ९ व्या राज्यस्तरीय तेंग सु डो कोरियन कराटे अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी होण्यासाठी दि.१६ सप्टेंबर २०२२ रोजी कराटे प्रशिक्षक बालाजी गाडेकर यांच्या नेतृत्वात भोकर येथून रवाना झाला असून ही राज्यस्तरीय स्पर्धा दि.१७ व १८ सप्टेंबर २०२२ रोजी होत आहे.नांदेड जिल्हा संघातील स्पायरींग फाईट या प्रकारात आराध्या ज्ञानदेव पुरी,श्रेयान गजानन धरमुरे,कार्तिक मनोज आडे,सत्यम मोहन राठोड, शिवम मोहन राठोड,श्रेयस संजय वानोळे,स्वरा गोपीनाथ सूर्यवंशी,श्वेता शिवाजी जाधव,यशवर्धन नरहरी भडके, सुयोग गोपीनाथ सूर्यवंशी,यश हनुमान कोवे,श्रुती मनोज आडे,श्रेयश राधेश्याम शहाघंटवार,श्लोक राम जाधव,आरुष शाम पोतदार,मारोती राजकुमार त्रिमकदार,अभिर धनंजय भालेराव,प्रतीक बंडू तेलंगे,वीर पवन चेपुरवार,आदित्य गणेश जाधव,इशा उमेश लोखंडे,प्रतीक्षा रोहिदास आडे, धनश्री भगवान हाके,नरहरी शिवाजी घिसेवाड,प्रणव नागोराव जाधव,शंतनु भानुदास बामणे,सलोनी विनोद सुरदसे,पार्वती प्रेमसिंग चव्हाण,राणी किशन जाधव,वरद बाजीराव पतंगे,विनायक शिवाजीराव मोरे,वैजयंती अनिल मोरे,दुर्गा गजानन मोरे,श्रावणी संभाजी मोरे,पार्थ पंडितराव मोरे,ऋतुजा राजकमल पोतदार,गीता सुधाकर जाधव.तसेच
पुमसे या प्रकारात रोशनी सुरेश चव्हाण,अवनी सचिन हुलसुरे,समर्थ साईनाथ हामंद,देवेश उमेश लोखंडे,यश अमृतराज वागतकर हे खेळाडू रवाना झाले आहेत.
तर या जिल्हा संघाचे मुख्य प्रशिक्षक बालाजी एल.गाडेकर भोकर जि.नांदेड,जिल्हा तेंग सु डो स्पोर्ट्स असोसिएशन अध्यक्ष एकनाथ शिरसे,तसेच दिगंबरराव बिंदू महाविद्याल भोकरचे क्रीडा प्रमुख प्रा.डॉ.व्यंकटराव माने, रातोळेसरस व्हिजन एज्युकेशन पॉईंट भोकर चे संचालक एस.पी. रातोळे,जनता विकास परिषद तथा नाम फाउंडेशन भोकर तालुका अध्यक्ष इंजि.विश्वंभर पवार पाटील,भोकर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संपादक उत्तम बाबळे, कोषाध्यक्ष गंगाधर पडवळे,पत्रकार शुभम नर्तावार, कमलाकर बरकमकर,विशाल जाधव,तसेच सर्व पालक वर्ग यांनी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या व स्पर्धेत सहभागी होण्यासाठी रवाना झालेल्या सर्व खेळाडूंना पुढील यशासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.तर या संघासोबत टीम मॅनेजर म्हणून नितीन देडे,संघ व्यवस्थापक विशाल गायकवाड,महिला कराटे प्रशिक्षिका कु.पार्वती प्रेमसिंग चव्हाण,पालक प्रतिनिधी म्हणून गोपीनाथ सूर्यवंशी,महिला पालक प्रतिनिधी सौ.करुणा ज्ञानदेव पुरी,सौ.शोभा मनोज आडे हे देखील खेळाडूंसोबत रवाना झाले आहेत.