Mon. Dec 23rd, 2024

दोन अट्टल चोरांसह चोरी गेलेल्या १४ दुचाकी जप्त करण्यात भोकर पोलीसांना आले यश

Spread the love

दोन महिन्याच्या अल्प कालावधीतील ही धाडसी शोध माहिम असून भोकर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या १८ गुन्ह्यापैकी १४ गुन्ह्यातील दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.

अंबुज प्रहार प्रतिनिधी

भोकर : भोकर पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून दुचाकी चोरीचे गुन्हे प्रकार वाढले होते. दरम्यानच्या काळात जवळसास १८ गुन्हे दाखल झाले आहेत.याची गंभीरपणे दखल घेऊन पोलीस निरीक्षक विकास पाटील यांनी सदरील गुन्हे तपासासाठी एक विशेस पथक तयार केले.या पथकाच्या अथक परिश्रमास यश आले असून त्यांनी दोन महिन्यात दोन अट्टल दुचाकी चोरांना पकडले व त्यांच्याकडून चोरलेल्या १४ दुचाकी जप्त केल्या आहेत.जप्त करण्यात आलेल्या दुचाकींची ओळख पटवून फिर्यादींनी त्या घेऊन जाव्यात असे आवाहन करण्यात आले आहे.

भोकर पोलीस सठाणे कार्यक्षेत्र व परिसरात गेल्या काही दिवसांपासून दुचाकी चोरीचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले होते. याची गंभीर दखल घेवून पोलीस निरीक्षक विकास पाटील यांनी पोलीस उप निरीक्षक अनिक कांबळे यांच्या नेतृत्वात जमादार दिलीप जाधव,पो.ना.व्यंकटेश आलेवार, पो.कॉ.खेडकर यांचे एक गुन्हे शोध पथक तयार केले होते. या पथकाने मागिल महिन्यात अट्टल दुचाकी चोर अनिल उत्तम गवारे रा.बळीरामपुर यास मोठ्या शिताफीने अटक केली होती.त्याची अधिक चौकशी केली असता त्याने दुचाकी चोरल्याच्या गुन्हयाची कबुली दिली. यावेळी त्याच्याकडून अंदाजे ५ लाख ५० हजार रुपये किमतीच्या चोरलेल्या वेगवेगळ्या कंपनीच्या ८ दुचाकी जप्त करण्यात आल्या.तसेच या दुचाकी चोरानंतर बाबु मामीलवार रा. टाकराळा या दुचाकी चोरास पकड्यास वरील पथकास नुकतेच यश आले असून त्याची चौकशी केली असता त्याने ही दुचाकी चोरल्या असल्याची कबूली दिली.यावरून त्याच्याकडून सुध्दा अंदाजे २ लाख ५० हजार रुपये किमतीच्या वेगवेगळ्या कंपनीच्या चोरलेल्या ५ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.तर उर्वरीत गुन्ह्यांचा पुढील तपास भोकर पोलीस करत आहेत.

दुचाकी चोरांना व चोरीस गेलेल्या दुचाकी हस्तगत करणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे पो.नि.विकास पाटील यांनी केले अभिनंदन!

पो.नि.विकास पाटील यांनी दिली ही माहिती व पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे केले अभिनंदन !व्हीडीओ…

पोलीस उप निरीक्षक अनिल कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली नियुक्त शोध पथकातील जमादार दिलीप जाधव,पो.ना. व्यंकटेश आलेवार,पो.कॉ.खेडेकर यांनी अनिल उत्तम गवारे रा.बळीरामपुर व बाबु मामीलवार रा.टाकराळा ता. हिमायतनगर या दोन अट्टल दुचाकी चोरांना पकडले.तसेच त्यांनी चोरलेल्या दुचाकी आदिलाबाद(तेलंगणा राज्य), किनवट,बोधडी,हिमायतनगर, नांदेड,उमरी अशा आदी ठिकाणांहून जप्त केल्या.या गुन्हे शोध मोहिमेत महिला पोलीस उप निरीक्षक राणी भोंडवे,पो.उप.नि.दिगांबर पाटील,सहा.पो.उप.नि.कराड,सहा.पो.उप.नि.प्रल्हाद बाचेवाड यांसह आदींनी सहकार्य केले.सदरील गुन्हे शोध मोहिमेत भोकर पोलीसात दाखल १८ गुन्ह्यापैकी १४ गुन्ह्यांतील १४ दुचाकी हस्तगत झाल्या आहेत.तर दोन्ही आरोपी हे न्यायालयीन कोठडीत आहेत.

अवघ्या काही दिवसातच या शोधपथकाने दोन आरोपी व त्यांच्याकडून चोरी गेलेल्या जवळपास ८ लाख रुपये किमतीच्या या दुचाकी जप्त करण्याची शोध माहिम यशस्वी केल्यामुळे पो.नि.विकास पाटील यांनी या सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.तसेच या माहिमेत हस्तगत करण्यात आलेल्या दुचाकींची फिर्यादींनी व मालकांनी ओळख पटवून देऊन मा.न्यायालयाच्या आदेशाने भोकर पोलीस ठाणे येथून त्या घेवून जाव्यात आणि आपल्या दुचाकींची चोरी होणार नाही अशा पद्धतीने सुरक्षेची सर्वांनी काळजी घ्यावी,असे आवाहन ही त्यांनी केले आहे.


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !