Mon. Dec 23rd, 2024

दुकान जाळपोळ प्रकरणी ‘चौघांना’२ दिवसाची पोलीस कोठडी

Spread the love

भोकरमध्ये शांतता असून कोणीही अफवांवर विश्वास ठेऊ नये-पो.नि.विकास पाटील

अंबुज प्रहार प्रतिनिधी

भोकर : छत्रपती शिवाजी महाराज चौक भोकर येथील गजानन बाबा मेडिकल स्टोअर दुकान जाळण्याचा प्रयत्न काहींनी केला होता.या प्रकरणी भोकर पोलीसात दि.११ जून रोजी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.तर जलदगतीने तपासचक्र फिरवून या गुन्ह्यातील चौघांना ताब्यात घेण्यासाठी पोलीसांना यश आले असून दि.१३ जून रोजी या चौघांना भोकर न्यायालयात हजर केले असता मा.न्यायालयाने त्यांना २ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज चौक भोकर येथील गजानन बाबा मेडिकल स्टोअर चे मालक गजानन अडकिणे यांच्या मुलाने समाज माध्यम इंस्टाग्रामवर एक आक्षेपाहर्य पोस्ट केल्यामुळे काही संतप्तांनी दि.१० जून २०२२ रोजी सदरील मेडिकल दुकान जाळण्याचा प्रयत्न केला होता.या जाळपोळीत जवळपास ६० हजार रुपये किमतीचे साहित्य व महत्वाचे कागदपत्र जळून खाक झाले होते.म्हणून दुकान मालक शरद धोडेराव अडकिणे, रा.भोकर यांनी दि.११ जून २०२२ रोजी भोकर पोलीसात याविषयी तक्रार दिली होती. या तक्रारीवरुन दि.११ जून २०२२ रोजी भोकर पोलीसात कलम ४३५ भादवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.तर सदरील गुन्ह्यातील आरोपींना तात्काळ पकडण्यात यावे व त्यांची अटक आणि घटनेच्या निषेधार्थ दि.१३ जून रोजी भोकर बंदचे आवाहन हिंदू बांधवांकडून करण्यात आले होते.यावेळी पो.नि.विकास पाटील यांनी त्या शिष्ठमंडळास आरोपींच्या अटकेविषयी आश्वस्त केले होते.तर स्वयंस्फुर्तीने हिंदू बांधवांनी आपापली दुकाने बंद ठेऊन ‘त्या’ घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला.

तसेच आरोपींच्या शोधासाठी पो.नि.विकास पाटील यांनी तपासचक्र गतिमान केले व दि.१२ जून २०२२ रोजी या गुन्ह्यातील सय्यद सद्दाम मुजाहेद,मजहर खान जाफर खान,शेख सलमान शेख इकबाल,सय्यद मुस्तफा सय्यद मुर्तुजा सर्वजण रा.भोकर यांना ताब्यात घेण्यात यांना यश आले.तर अन्य दोघांचा शोध सुरु आहे.एकून ६ जणांपैकी ताब्यात घेतलेल्या चौघांना दि.१३ जून २०२२ रोजी पोलीसांनी भोकर न्यायालयात हजर केले असता मा. न्यायालयाने या चौघांना २ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.तर पो.नि.विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील अधिक तपास पो.उप.नि. सुर्यकांत कांबळे हे करत आहेत.

भोकरमध्ये शांतता असून कोणीही अफवांवर विश्वास ठेऊ नये-पो.नि.विकास पाटील

भोकरमध्ये शांतता असून कोणीही अफवांवर विश्वास ठेऊ नये-पो.नि.विकास पाटील

मेडिकल दुकान जळपोळ प्रकरणातील ४ आरोपींना आम्ही अटक केलो आहोत.त्यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे.तर अन्य २ आरोपींचा शोध सुरच आहे. भोकरमध्ये कसल्याही प्रकारे कायदा,सुव्यवस्थेचा प्रश्न नसून सर्वत्र शांतता आहे. अशी माहिती पो.नि.विकास पाटील यांनी दिली आहे. तसेच नागरिकांनी कसल्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये,अफवा पसरवू नये.असे केल्यास त्यांच्या विरुद्ध योग्य ती कारवाई करण्यात येईल.तरी कायदा, सुव्यवस्था व शांततेसाठी सर्व नागरिकांनी पोलीस प्रशासनास सहकार्य करावे,असे आवाहन ही त्यांनी केले आहे.


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !