Mon. Dec 23rd, 2024

दसरा महोत्सव मिरवणूक व रावण दहन कार्यक्रमात सहभागी व्हावे

Spread the love

दसरा महोत्सव समिती भोकरच्या वतीने करण्यात आले आहे आवाहन

अंबुज प्रहार प्रतिनिधी

भोकर : कोरोना प्रादुर्भावाच्या संकटामुळे शासनाच्या वतीने प्रतिबंध घालण्यात आल्याने माघील दोन वर्ष कोणतेही सण उत्सव आनंदात सारे करता आले नव्हते. सुदैवाने या संकटावर सर्व भारतीयांनी मात केली असल्याने प्रतिबंधीत नियम अटी हटविण्यात आल्याने प्रतिवर्षी प्रमाणे यावर्षी भोकर येथे बुधवार,दि.५ ऑक्टोबर रोजी दसरा मिरवणूक व भव्य आतिषबाजीत प्रतिकात्मक रावण दहन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यात बहुसंख्येने सहभागी होऊन दसरा सण आनंदोत्सवात साजरा करावा,असे आवाहन दसरा महोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

दसरा महोत्सवाच्या निमित्ताने बुधवार,दि.५ ऑक्टोबर २०२२ रोजी भोकर नगरीत दसरा मिरवणूक व रावण दहन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.या कार्यक्रमास प्र.भोकर उपविभागीय अधिकारी तथा तहसिलदार राजेश लांडगे,अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे,उपविभागीय पोलीस अधिकारी सौ.अर्चना पाटील,सा.बा.वि.भोकरचे कार्यकारी अभियंता प्रशांत एन.कोरे,मुख्याधिकारी सौ. प्रियंका टोंगे,माजी नगराध्यक्षा सौ.संगिता विनोद चिंचाळकर,माजी उपनगराध्यक्षा जरीना बेगम युसूफ शेख यांसह आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

श्री बालाजी मंदीर,मोंढा भोकर येथे सायंकाळी ५.०० वाजता दसराचे मानकरी अशोक महाराज,बिंदू साहेब,प्रकाशराव नरसिंगराव देशमुख, अप्पाराव माली पा.,बालाजीराव राजाभाऊ,माणिकचंद दत्तोपंत जैन, धनंजय हनमंतराव देशपांडे,भुजंगराव शेट्टे गुरूजी,रघुनाथ मचकुरी यांचा उपरोक्त मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. यानंतर तोफेच्या सलामीने बालाजी मंदिरापासून दसरा मिरवणूकीस प्रारंभ होईल.ही मिरवणूक डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे,म.गांधी चौक,महादेव मंदिर मार्गे जाऊन जाऊन दसरा मारोतीचे पुजन व सिमोल्लंघन करण्यात येणार आहे.त्यांनतर रात्री ७:०० वाजता विविध रंगीबेरंगी फटाक्यांची भव्य आतीषबाजी व तोफेंच्या आवाजात दसरा मारोती मंदीर परिसरातील मैदानात प्रतिकात्मक ‘रावण दहन’ संपन्न होणार आहे.

तरी या कार्यक्रमात सहभागी होऊन दसरा सण आनंदोत्सवात साजरा करावा असे आवाहन दसरा महोत्सव समितीचे अध्यक्ष नागनाथ घिसेवाड,उपाध्यक्ष दिलीप सोनटक्के,उपाध्यक्ष गोविंद बाबागौड पाटील,कोषाध्यक्ष सुभाष पाटील किन्हाळकर,सचिव सतिष देशमुख, सल्लागार बि.आर.पांचाळ व सन्मानिय सदस्य डॉ.उत्तम जाधव,विनोद चिंचाळकर,गणपत पिठेवाड,सुभाषराव घंटलवार,शिवाजी पाटील किन्हाळकर,प्रशांत पोपशेटवार, भगवानराव दंडवे,अमोल पवार,संतोष मारकवार,मोहन श्रीरामवार,देवानंद धुत,धनराज पवार,प्रकाश देशमुख, प्रकाश मामा कोंडलवार,सोपानराव देशमुख,अशोक दिवशीकर,दिलीप चिंतावार,प्रा.डॉ.व्यंकट माने जगदेवराव देशमुख,बाळा साखळकर,शाम जैन,सुवेश पोकलवार,मास्टर टेलर, माधव पाटील वडगावकर,नागनाथ कोंडलवार,सुरेश चिंतावार,विजयकुमार धुत,बाबुराव आंदबोरीकर, त्र्यंबक पटवेकर,नागेश पिटलेवाड,सुभाष पाटील कोंडलवार,राहुल कॉडलवार,वेणू कोंडलवार,श्रीकांत किन्हाळकर,सुहास पवार,राजेश्वर देशमुख,साईदास माऊली,परसराम पांडलवाड,संतोष जंगेवाड,बालाजी घिसेवाड,केशव पुजलवाड,शंकर घंटलवाड,बाबु दशरथवाड,दत्तात्रय पांचाळ,दिलीप तिवारी,भिमराव दुधारे,नंदु -याकावार,एल.डी. देशपांडे, बाजू घिसेवाड,उत्तम बाबळे,मनोज चौव्हाण,विठ्ठल फुलारी,बाबुराव पाटील,बालाजी पाटील कोंडलवार,रमेश पाटील कोंडलवार,अशोक नेमानिवार,संतोष जोशी,सिध्दार्थ जाधव,पिटलेवाड,गणपत माळवंतकर,निळकंठ वर्षेवार,दिलीप सोनवडे,विजयकुमार मारुडवाड, शंकर पाटील पोमनाळकर,दिलीप राव,नरसिंग माली पाटील,व्यंकट वर्षेवार,योगेश देशपांडे,बबन शाहगंठवार,गंगाधर नक्कलवाड,गोपाळ परसलवाड,शंकर बाबागौड,अवधुत नारमवाड,बालाजी गेंटेवार,संभाजी मामीडवार,संजय दरबस्तवार,मनोज मनुरवार,मधुकर चार्लेवाड,व्यंकट घिसेवाड,दत्ता गोलेवाड याच बरोबर माजी नगर सेवक व सेविका श्रीदेवी संतोष मारकवार,सौ.अरुणा देशमख,सौ.मिनाताई दंडवे, साहेबराव सोमेवाड,खाजा तौफीक इनामदार,शेख वकील शेख खैराती, सौ.वनमाला क्षिरसागर, सुवेश पोकलवार,सुर्यकांत चिंचाळकर,मनोज गिमेकर,सौ. उषाताई घिसेवाड,सौ.अनिता राम जाधव,केशव रामा मुठेवाड,सौ.विजया घुमानवाड घिसेवाड,सौ.सुवर्णाबाई वाघमारे,सौ. अफसरी गफार शेख आणि स्वच्छता प्रमुख दिलीप वाघमारे यांनी केले आहे.


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !