‘थोडेसे माय बापासाठी पण’ उपक्रमांतर्गत गरजू वृद्धांना काठ्या वाटप
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त प्राथमिक आरोग्य केंद्र किनी ता. भोकरच्या वतीने घेण्यात आलेल्या आरोग्य शिबिरात १५७ जणांची केली आरोग्य तपासणी
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या औचित्याने प्राथमिक आरोग्य केंद्र किनी ता.भोकरच्या वतीने दि.१७ सप्टेंबर रोजी घेण्यात आलेल्या आरोग्य तपासणी शिबिरात १५७ रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात येऊन औषधीचे वाटप ही करण्यात आले. तसेच ‘थोडेसे माय बापासाठी पण’ या उपक्रमांतर्गत २० गरजू वृद्धांना चालतांना आधार मिळावा यासाठी काठ्यांचे वाटप ही करण्यात आले आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्र किनी ता.भोकरच्या वतीने किनी येथे दि.१७ सप्टेंबर २०२२ रोजी आरोग्य तपासणी व औषधी वाटप शिबिर घेण्यात आले.या शिबिरात नांदेड येथील तज्ञ डॉ.सत्यनारायण मुरमुरे,भोकर तालुका आरोग्य अधिकारी डॉ.राहुल वाघमारे,डॉ.राजकुमार सुर्यवंशी,डॉ.निलेवार यांसह आदींनी जवळपास १५७ रुग्णांची तपासणी केली.यावेळी ३ मधुमेह व २ रक्तदाबाचे रुग्णांवर उपचार करुन त्यांना औषधी देण्यात आली.तर ‘थोडेसे माय बापांसाठी पण’ हा उपक्रम राबविण्यात आला.या उपक्रमांतर्गत २० गरजू वृद्धांना चालण्यासाठी आधार मिळावा म्हणून काठ्यांचे वाटप करण्यात आले.तसेच तालुक्यातील प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेंतर्गतच्या २३४ लाभर्थींना माहे एप्रिल २०२२ ते या महिन्या पर्यंतचे अनुदान ही वाटप करण्यात आले आहे.तर सदरील आरोग्य तपासणी शिबिराच्या यशस्वीतेसाठी सर्व वैद्यकीय अधिकारी, तालुका पर्यवेक्षक एम.ए.सय्यद,सर्व आरोग्य कर्मचारी व आशा वर्कर यांनी सहभागी होऊन परिश्रम घेतले.