Mon. Dec 23rd, 2024

‘त्या’ १० ग्रामपंचायतीचे सरपंच पद आता अनुसूचित जातीकडे

Spread the love

भोकर तालुक्यातील अनुसूचित जमाती सदस्या अभावी रिक्त असलेल्या सरपंच पदांच्या आरक्षणाची २७ सप्टेंबर रोजी झाली सोडत

अंबुज प्रहार प्रतिनिधी

भोकर : तालुक्यातील १० ग्रामपंचायतींचे सरपंच पद अनुसूचित जमातीच्या ग्राम पंचायत सदस्या अभावी जानेवारी २०२१ पासून रिक्त होते.त्या सदस्याच्या अभावामुळे सरपंच पदापासून अन्य सदस्यांना वंचित रहावे लागत होते.याबाब रेणापूर ता.भोकर येथील ग्रामपंचायत सदस्य प्रा.डॉ.कैलास कानिंदे यांनी शासन, प्रशासन दरबारी न्यायदाद मागितल्याने त्या रिक्त सरपंच पदांच्या आरक्षण सोडतीची तारीख निश्चित झाली व दि.२७ सप्टेंबर रोजी तहसिलदार राजेश लांडगे यांनी आरक्षण सोडतीत त्या १० ग्रामपंचायतीचे सरपंच पद अनुसूचित जाती सदस्यांकडे देण्याचे घोषित केले असून यात ६ जागी अनुसूचित जाती महिला राखीव, तर ४ जागा अनुसूचित जाती सर्वसाधारणसाठी असल्याचा समावेश आहे.

सन २०२१ मध्ये भोकर तालुक्यातील रेणापर,जाकापूर, धारजणी,धावरी खु.,रावणगाव,दिवशी खु.,हस्सापूर,सायाळ, कोळगाव खु.,व बटाळा-किन्हाळा या १० ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक संपन्न झाली.या ग्रामपंचायतींचे सरपंच पद अनुसूचित जमातीं करीता आरक्षित झाले.परंतू अनुसूचित जमातींचे सदस्यच तेथे उपलब्ध होऊ न शकल्याने तेंव्हापासून सरपंच रिक्त राहिले व त्या सदस्यां अभावी कार्यभार उपसरपंचांच्या हाती सोपवला गेला.ही बाब अन्य सदस्यांना सरपंच पदापासूनच वंचित ठेवणारी असल्याने रेणापूर येथील ग्रामपंचायत सदस्य प्रा.डॉ.कैलास कानिंदे व आदी समासेवींनी न्यायदाद मागितली होती.त्याच अनुशंगाने प्रशासनाने उपरोक्त गावांच्या सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीची तारीख निश्चित केली.त्या आदेशानुसार दि.२७ सप्टेंबर २०२२ रोजी प्राधिकृत अधिकारी तथा तहसिलदार राजेश लांडगे यांनी कायद्याचा अभ्यास करून व जिल्हाधिकारी यांचे आदेशाचे पालन करत उर्वरित कार्यकाळासाठी सरपंच पदासाठी आरक्षण सोडत जाहीर केली.ती पुढील प्रमाणे… रेणापुर-अनुसूचित जाती (सर्वसाधारण),जाकापूर-अनुसूचित जाती(स.सा.), धारजणी-अनुसूचित जाती(स.सा.),धावरी खु.-अनुसूचित जाती(स.सा.), रावणगाव-अनुसूचित जाती महिला राखीव, दिवशी खु.-अनुसूचित जाती महिला,हस्सापूर-अनुसूचित जाती महिला,सायाळ- अनुसूचित जाती महिला,कोळगाव खु.-अनुसूचित जाती महिला आणि बटाळा/ किन्हाळा-अनुसूचित जाती महिला. असे आरक्षण जाहीर करण्यात आले.सदरील आरक्षण सोडतीतून आता उपरोक्त गावांना हक्काचा सरपंच मिळणार असून गावाच्या विकासाला चालना मिळेल अशी अपेक्षा त्या गावातील नागरिकांमधून व्यक्त होत आहे.या आरक्षण सोडत प्रसंगी गटविकास अधिकारी अमित राठोड,निवडणूक विभागाचे कर्मचारी,त्या ग्रामपंचायतींचे सदस्य व संबंधित गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि पत्रकार बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

श्याम बाबू पट्टापू यांनी जाकापूरचे नुतन सरपंच सुनिल जाधव यांचे अभिनंदन करुन भावी सेवाकार्यासाठी दिल्या शुभेच्छा!

मौ.जाकापूर ग्रामपंचायतीच्या सरपंच पद अनुसूचित जमाती सदस्यासाठी राखीव होते.परंतू तेथे सदरील प्रवर्गातील सदस्य उपलब्ध होऊ न शकल्याने सरपंच पद रिक्त होते.या पदावर त्या गावातील श्रमजीवी,होतकरु,अभ्यासू व्यक्तीमत्व म्हणून परिचित असलेल्या वार्ड क्र.२ मधून निवडूण आलेल्या सुनिल मुकिंदा जाधव यांची या ७ सदस्यीय ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी नियुक्ती करावी अशी अनेकांची इच्छा होती.सुनिल जाधव व त्यांच्या समर्थकांकडून तसा प्रयत्न ही करण्यात आला होता.सुदैवाने त्यांच्या प्रयत्नांना काल झालेल्या आरक्षण सोडतीतून न्याय मिळाला व आता अनुसूत जातीचे ते तेथील एकमेव सदस्य असल्याने सरपंच पदी त्यांचीच वर्णी लागणार आहे.यामुळे वर्ल्ड व्हिजन इंडिया चे व्यवस्थापक श्याम बाबू पट्टापू यांनी त्यांचे अभिनंदन केले असून भावी सेवाकार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
जाकापूर ग्रामपंचायतीचे नुतन सरपंच सुनिल जाधव व उर्वरीत सर्व ग्रामपंचायतीच्या सरपंचाचे संपादक उत्तम बाबळे यांच्या वतीने देखील हार्दिक अभिनंदन आणि भावी सेवाकार्यासाठी मनस्वी हार्दिक शुभेच्छा!


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !