Sat. Dec 21st, 2024
Spread the love

अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : तेलंगणा राज्यात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांनी दणदणीत विजयश्री प्राप्त केली असल्याने तेलंगणा राज्य सीमेलगतच्या महाराष्ट्रातील भोकर मध्ये सोमवार दि.४ डिसेंबर रोजी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकत्यांनी ढोल ताषाच्या गजरात व भव्य आतषबाजीने जल्लोष साजरा केला.

तेलंगणा विधानसभा निवडणूकीत काँग्रेस पक्षाकडून विशेष निरीक्षक म्हणून माजी मुख्यमंत्री तथा भोकर विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार अशोकराव चव्हाण यांच्याकडे पक्षश्रेष्ठींनी जबाबदारी होती.त्या अनुषंगाने त्यांनी नियोजनबद्धरित्या प्रचारयंत्रणा राबविल्याने तेलंगणातील काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांनी स्पष्ट बहुमताने विजयश्री मिळविली.यामुळे तेलंगणा राज्यासह महाराष्ट्रातील काँग्रेस पक्ष कार्यकर्त्यांत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. म्हणून तेलंगणातील काँग्रेस पक्षाच्या विजयाचा सोमवार,दि.४ डिसेंबर २०२४ रोजी भोकर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात काँग्रेस पक्षाच्या कार्यत्यांनी ढोलताशाच्या गजरात व फटाक्यांच्या भव्य आतषबाजीने मोठ्या आनंदोत्सवात जल्लोष साजरा केला आहे.यावेळी कॉंग्रेस पक्षाचा विजय असो,आ.अशोकराव चव्हाण आगे बढो….अशा घोषणा देण्यात आल्या.तसेच काँग्रेस कमिटीचे भोकर तालुकाध्यक्ष भगवानराव दंडवे,सभापती जगदीश पाटील भोसीकर,संचालक रामचंद्र मुसळे यांसह आदींनी मनोगतातून आ.अशोकराव चव्हाण व तेलंगणातील नवनिर्वाचित आमदार आणि पक्षश्रेष्ठींचे हार्दिक अभिनंदन केले. तर हा आनंदोत्सवी जल्लोष साजरा करतांना माजी नगराध्यक्ष विनोद पाटील चिंचाळकर,माजी पं.स. सभापती गोविंद पाटील गौड,उपसभापती बालाजी शानमवाड, युवकचे अध्यक्ष आत्रीक पाटील मुंगल,भोकर शहराध्यक्ष खाजु इनामदार,माधव अमृतवाड,मिर्झा ताहेर बेग,राजकुमार अंगरवार,डॉ.मनोज गिमेकर,सना इनामदार,दत्ता डोंगरे, शिवाजी पाटील लगळूदकर,डॉ.फिरोज इनामदार, जवाजोदीन बरबडेकर,सचिन पांचाळ,विनोद चव्हाण,बालाजी पांचाळ, मोहन राठोड,संजय बरकमकर,विकास क्षिरसागर,विठल धोंडगे,सुरेश कावळे, गोविंद मेटकर,परमेश्वर भालेराव,बाबुराव सरोदे,फारूख करखेलीकर,अनिल डोईफोडे,विठ्ठल माचनवार,आदिनाथ चिंताकुटे,बालाजी येलपे,सुरेखा माळे,अनिता साबळे,कमल गाजुलवार यांसह बहुसंख्य कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !