तन्जीम ए ईन्साफ जिल्हा मुख्य संघटकपदी अब्दुल हकीम यांची नियुक्ती
या नियुक्तीमुळे भोकर येथे त्यांचा करण्यात आला यथोचित सत्कार
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : ऑल इंडिया तन्जीम ए इन्साफ संघटनेची जिल्हा कार्यकारिणी नुकतीच गठीत करण्यात आली असून नांदेड जिल्हाध्यक्षपदी शेख रियाज चांदपाशा तर जिल्हा मुख्य संघटकपदी भोकर येथील व्यापारी अब्दुल हकीम अब्दुल करिम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.या नियुक्तीमुळे भोकर येथे त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला आहे.
ऑल इंडिया तन्जीम ए इन्साफचे प्रदेशाध्यक्ष एस.जी. शुत्तारी,महासचिव अशफाक सलामी यांच्या सूचनेनुसार माजी राष्ट्रीय सचिव फारूख अहमद, भाकपा नेते काॅ. प्रदिप नागापुरकर यांनी नुकतीच नांदेड जिल्हा कार्यकारिणी घोषित केली आहे.यावेळी आमेर अरसिल, मोहम्मद कासिम,ईशान खान,अब्दुल समी यांची उपस्थिती होती.अल्पसंख्यांक समाजात शैक्षणिक, सामाजिक,आर्थिक समस्यांवर जनजागृती करणारी व अन्यायाविरूद्ध लढा देणारी देशपातळीवरील एकमेव संघटना म्हणून ‘ऑल इंडिया तन्जीम ए इन्साफ’ ची ओळख आहे.या सामाजिक संघटनेच्या नांदेड जिल्हाध्यक्ष पदी शेख रियाज चांदपाशा यांची तर मुख्य संघटकपदी भोकर येथील सामाजिक कार्यकर्ते तथा व्यापारी अब्दुल हकीम अब्दुल करीम,जिल्हा कार्याध्यक्षपदी सुनिल सोनसळे, महासचिव वलियोद्दीन फारुखी बिलोली,हरपाल सिंग गुलाटी,जिल्हा समन्वयक इर्शाद पटेल देगलूर,जिल्हा उपाध्यक्ष शेख मलंग,लोहा व म.मोईज,धर्माबाद,सचिव शेख हुसेन रायवाडीकर, सहसचिव सद्दाम पटेल नरसीकर,कोषाध्यक्ष शेख आरिफ नायगाव,सह कोषाध्यक्ष हाफिज शेख असिमसाब कंधार, प्रसिध्दीप्रमुख मुस्तफा पिंजारी बेटमोगरेकर,जिल्हा कार्यकारिणी सदस्य सय्यद मुजीब अहमद मुदखेड, सय्यद नईम मुल्ला मुखेड,यांसह आदी पदाधिका-यांची निवड करण्यात आली.
या कार्यकारिणीचे मार्गदर्शक काॅ.प्रदिप नागापुरकर,काॅ.शेख गफारसाब सावरगावकर हे असून आगामी काळात भारतीय संविधानानुसार देशात समता,बंधूता, सामाजिक ऐक्य वाढविण्यासाठी प्रयत्न करून अल्पसंख्याक समाजावरील होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरूध्द जन आंदोलन उभारण्याचा निर्धार या नवनिर्वाचित कार्यकारिणीने केला आहे.
तर उपरोक्त नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे विविध क्षेत्रातील अनेकांतून अभिनंदन होत असून भोकर येथील नवनियुक्त मुख्य संघटक अब्दुल हकीम अब्दुल करीम यांची नियुक्ती झाल्याबद्दल भोकर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष डॉक्टर फेरोज खान इनामदार,सामाजिक कार्यकर्ते एजाज अहमद,अब्दुल बासित खतीब,निजामाबाद येथील गुत्तेदार शेख इस्माईल,अब्दुल सलीम सेठ,पत्रकार लतीफ शेख, पत्रकार एजाज कुरेशी,मुख्तार अन्सारी,युवक काँग्रेसचे शेख फारुख करखेलीकर यांसह आदींनी त्यांचा यथोचित सत्कार केला व भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.