डॉ.शंकरराव चव्हाण यांच्या जयंती निमित्त आज भोकरमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : माजी केंद्रीय गृहमंत्री,महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री,महाराष्ट्राच्या विकासाचे भगीरथ, जलक्रांतीचे प्रणेते डॉ.शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त आज भोकरमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून सदरील कार्यक्रमांना बहुसंख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
महाराष्ट्र व मराठवाड्याच्या विकासाचे शिल्पकार जलक्रांतीचे प्रणेते डॉ.शंकरराव चव्हाण यांच्या जयंती निमित्त भोकर येथे दि.१४ जुलै २०२३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.सकाळी ९:०० वाजता काँग्रेस कमिटी कार्यालयात व सकाळी ९ :३० वाजता डॉ. शंकरराव चव्हाण कृषि उत्पन्न बाजार समिती येथे अभिवादन सोहळा होणार आहे.तर सकाळी १०:०० वाजता कृषि उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणातील व्यापारी शेडमध्ये भव्य रक्तदान शिबिर घेण्यात येणार आहे.तसेच वृक्षारोपण, रुग्णांना फळे वाटप यांसह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.तरी उपरोक्त सर्व कार्यक्रमांना काँग्रेस पक्षाचे भोकर तालुका व शहर काँग्रेस कमिटी,सर्व सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते,यांसह ग्रामीण भागातील जनतेने बहुसंख्येने उपस्थित राहावे,असे आवाहन भोकर तालुका काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष भगवानराव दंडवे, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अत्रिक पाटील मुंगल, शहराध्यक्ष रमिजोद्दीन उर्फ खाजू इनामदार यांनी केले आहे.
संपादक उत्तम बाबळे व अंबुज प्रहार न्युज लाईव्ह परिवाराच्या वतीने स्व.डॉ.शंकरराव चव्हाण यांना विनम्र अभिवादन!