डॉ.राहुल वाघमारे यांची बारामती येथे झाली बदली
भोकर तालुका आरोग्य अधिकारी आणि प्राथमिक आरोग्य केंद्र किनी चे वैद्यकीय अधिकारी म्हणून त्यांनी उत्तमरित्या पार पाडली दुहेरी जबाबदारी
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक शासकीय रुग्णालयातून ज्यांनी उत्तम प्रकारे गरीब,गरजू व होतकरू रुग्णांची आरोग्य सेवा बजावली आहे असे सामाजिक जान असलेले समाजसेवी व्यक्तिमत्त्व भोकर तालुका आरोग्य अधिकारी डॉ.राहुल वाघमारे यांची नुकतीच बारामती जि.पुणे येथे प्रशासकीय बदली झाली आहे.
डॉ.राहुल माधवराव वाघमारे यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र,किनी ता.भोकर येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून फेब्रुवारी २०१७ मध्ये पदभार स्विकारला.येथे गरीब, गरजू व होतकरू रुग्णांची आरोग्यसेवा बजावत असतांनाच त्यांच्या तत्पर सेवेची दखल घेऊन आरोग्य विभागाने भोकर तालुका आरोग्य अधिकारी पदाची जबाबदारी त्यांच्यावर टाकली.तालुका आरोग्य अधिकारी म्हणून त्यांनी डिसेंबर २०१९ मध्ये पदभार स्विकारला.दरम्यानच्या काळात ही दुहेरी जबाबदारी व आरोग्य सेवा कर्तव्य पार पाडताना त्यांना अनेक अडचणींनी सामना करावा लागला.तालुक्यातील बोगस डॉक्टर शोध मोहिम राबवून त्यांच्या विरुद्ध कारवाई करतांना त्यांना अनेकांचा विरोध पत्करावा लागला.परंतू यामुळे ते कधीही खचले नाहीत.तर अधिक जोमाने त्यांनी आरोग्य सेवा व तालुका आरोग्य अधिकारी पदाचे कर्तव्य पार पाडले.ते एक तज्ञ सर्जन असल्याने त्यांना जिल्ह्यातील अनेक शासकीय रुग्णालयात ऑपरेशन करण्यासाठी बोलावले जायचे. सामाजिक जान व भान असल्याने त्यांनी आरोग्य सेवेसह समाजसेवी कामांत ही उत्तमरित्या सहभाग नोंदविला आहे.त्यांच्या या दुहेरी कार्याची दखल घेऊन भोकर येथील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सार्वजनिक जयंती मंडळाने ऑगस्ट २०२१ मध्ये साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे समाज भुषण पुरस्कार देऊन त्यांचा यथोचित गौरव केला आहे.
डॉ.राहुल माधवराव वाघमारे हे रुग्णात जेवढे लोकप्रिय होते तेवढेच कार्यालयीन सहकारी डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांत ही लोकप्रिय होते.अशा सेवाभावी व्यक्तिमत्वाची दि.१० जून २०२३ रोजी महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा,गट-अ या संवर्गातील वैद्यकीय अधिकारी म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्र किनी ता.भोकर येथून बारामती जि.पुणे येथील स्त्री रुग्णालयात प्रशासकीय बदली करण्यात आली असून तुळशीदास सोळंके,सहसंचालक (अर्थ व प्रशासन) आरोग्य सेवा आयुक्तालय,मुंबई यांच्या स्वाक्षरीने बदलीचे आदेशपत्र त्यांना प्राप्त झाले आहे.याच अनुषंगाने दि.१३ जून २०२३ रोजी तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातील कर्मचारी बंधू भगिणींनी त्यांचा सेवा कर्तव्यपुर्ती गौरव केला आणि पुढील सेवाकार्यासाठी अनेक शुभेच्छांसह त्यांची रवानगी केली आहे.संपादक उत्तम बाबळे व परिवाराच्या वतीने डॉ.राहुल वाघमारे यांना पुढील आरोग्य आणि समाजसेवी कार्यासाठी अगदी मनापासून खुप खुप हार्दिक शुभेच्छा!