डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती मंडळ भोकर अध्यक्षपदी मोरे;तर सचिव पदी कावळे
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : विश्वभुषण भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती सोहळ्याच्या अनुषंगाने भोकर येथे विविध प्रबोधनात्मक,लोकोपयोगी कार्यक्रम आणि उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून यास्तव दि.२० मार्च रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती मंडळ भोकर ची नुतन कार्यकारिणी निवडण्यात आली आहे.या कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी बौद्ध महासभेचे शहराध्यक्ष साहेबराव हरी मोरे यांची व सचिवपदी निवृत्त न.प.कर्मचारी तथा जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश विठ्ठलराव कावळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली असून यांच्यासह सर्व कार्यकारिणीचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.
गेल्या दोन वर्षांपासून कोरोना प्रादुर्भाव नियंत्रण नियमावली पालनाच्या निमित्ताने सर्व सण,उत्सव,जयंती सोहळे व आदी कार्यक्रमांवर सार्वजनिकरित्या साजरे करण्यास बंदी घातली होती.परंतु यावर्षी कोरोनाचे संकट टळले असल्याने सार्वजनिक कार्यक्रम व सोहळे साजरे केले जात आहेत.यामुळे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती सोहळा भोकर येथे विविध प्रबोधनात्मक, लोकोपयोगी कार्यक्रम व उपक्रम मोठ्या उत्साहात साजरे करण्याचा संकल्प भोकर येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे.याच औचित्याने दि.२० मार्च २०२२ रोजी दुपारी शासकीय विश्रामगृह भोकर येथे सामाजिक कार्यकर्त्यांची एक व्यापक बैठक घेण्यात आली. या बैठकीत विविध कार्यक्रमांनी जयंती सोहळा साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.तसेच यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती मंडळ भोकर ची नुतन कार्यकारिणी सर्वानुमते निवडण्यात आली.
उर्वरित कार्यकारिणी पुढील प्रमाणे…उपाध्यक्ष- मधूकर गणपतराव गोवंदे,प्रतिक दिगांबरराव कदम,मनोज पंढरीनाथ गिमेकर,कपिल आनंद कांबळे,कोषाध्यक्ष-दिलीप केरबा राव, कार्याध्यक्ष-गौतम गोविंदराव कसबे,सहसचिव-विक्रम पुंडलिकराव क्षिरसागर,संघटक-देविदास भगवान हटकर, भिमराव संभाजी दुधारे,अमोल.विठ्ठलराव वाघमारे, मिलिंद किशनराव गायकवाड, सदस्पदी-जयभीम संभाजी पाटील,राजू किशन दांडगे,राहूल कोंडिबा कदम,सम्राट लक्ष्मण हिरे, दलित देवन डोंगरे,सल्लागार पदी-पी.एम.तोडे,सांस्कृतिक विभाग प्रमुख पदी शाहीर बाबूराव गाडेकर,तर प्रसिद्धी प्रमुख पदी-जेष्ठ पत्रकार एल.ए.हिरे,बी.आर.पांचाळ,बाबूराव पाटील,उत्तम बाबळे, आर.के.कदम,सुधांशू कांबळे,रमेश गंगासागरे,यांसह भोकर येथील सर्व पत्रकार बांधवांची निवड करण्यात आली आहे.