जेष्ठ नागरिक स्व.श्रीमती गंगाबाई किन्हाळकर पंचतत्वात विलीन
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : भोकर येथील प्रतिष्ठित व्यापारी व्यंकटराव पाटील किन्हाळकर व नांदेड येथील यशवंत महाविद्यालयाचे माजी उपप्राचार्य प्रा.गोविंद पाटील किन्हाळकर यांच्या मातोश्री श्रीमती गंगाबाई रामराव पाटील किन्हाळकर यांचे दि.२७ सप्टेंबर २०२२ रोजी पहाटेच्या दरम्यान वृद्धापकाळी अल्पशः आजाराने राहते घरी,नवा मोंढा भोकर येथे दु:खद निधन झाले.
स्व.श्रीमती गंगाबाई किन्हाळकर या माजी मंत्री डॉ. माधवराव पाटील किन्हाळकर,सामाजिक कार्यकर्ते तथा शिवसेनेचे नेते शिवाजी पाटील किन्हाळकर,जिल्हा नियोजन समिती सदस्य तथा बाजार समितीचे संचालक सुभाष पाटील किन्हाळकर यांच्या काकू(चुलती) होत्या.तर भारतीय जनता पार्टीचे युवा अध्यक्ष श्रीकांत पाटील किन्हाळकर यांच्या आजी होत्या.त्यांच्या पश्चात २ मुले, मुलगी,सुना,जावई,नातवंडे असा मोठा परिवार आहे.त्यांच्या पार्थिवावर दि.२७ सप्टेंबर २०२२ रोजी दुपारी ४:०० वाजता वैकुंठधाम हिंदू दहनभुभी,भोकर येथे शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी डॉ. माधवराव पाटील किन्हाळकर यांनी आपल्या काकूस मनोगतातून भावपुर्ण श्रद्धांजली वाहिली.तर भाजपाचे युवा नेते प्रविण पाटील चिखलीकर,गोविंदराव पाटील सिंधीकर, प्रसिद्ध कवयित्री डॉ.वृशाली माधवराव किन्हाळकर,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष दिलीप सोनटक्के,भाजपा तालुकाध्यक्ष किशोर पाटील लगळूदकर,डॉ.सतिश पाटील किन्हाळकर, भाजाचे जेष्ठ कार्यकर्ते प्रकाश मामा कोंडलवार,बाळा साकळकर,गणपत पिट्टेवाड, संतोष मारकवार,मुख्याद्यापक बी.ए.जाधव,शिवसेनेचे माधव पाटील वडगावकर,आनंदराव पाटील बोरगावकर,भोकर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संपादक उत्तम बाबळे,सचिव बालाजी नार्लेवाड, प्रा.डॉ.व्यंकट माने,माजी नगराध्यक्ष विनोद पाटील चिंचाळकर,साहेबराव सोमेवाड,काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष भगवान दंडवे,खरेदी विक्री संघाचे चेअरमन मारोती बल्लाळकर,रा.काँ.पा.चे तालुकाध्यक्ष इंजि. विश्वंभर पवार यांसह व्यापारी,अधिकारी,विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित नागरिक व नातेवाईकांची या अंत्यसंस्कार समयी बहुसंख्येने उपस्थिती होती.
किन्हाळकर परिवाराच्या दु:खात संपादक उत्तम बाबळे व परिवार सहभागी असून स्व.श्रीमती गंगाबाई किन्हाळकर यांना विनम्र भावपुर्ण श्रद्धांजली!