Mon. Dec 23rd, 2024

जीवनात सुसंस्कार व योग्य सोबत अतिशय महत्वाची असते-ह.भ.प. कु.कांचनताई शेळके

Spread the love

अंबुज प्रहार प्रतिनिधी

भोकर : राजमाता माँसाहेब जिजाऊंचे संस्कार व मावळयांची सार्थ साथ मिळाली म्हणूनच रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न साकार केले.शिवरायांना सुसंस्कार व योग्य सहकारी मावळ्यांची सार्थ साथ मिळाली, त्यामुळेच हे महत्कार्य होऊ शकले.म्हणून जीवनात सुसंस्कार व योग्य व्यक्तींची सोबत अतिशय महत्वाची असते,असे प्रबोधनात्मक मनोगत ह.भ.प.कु.कांचनताई शेळके यांनी किर्तनरुपी सेवा बजावतांना व्यक्त केले.मौ. बोरगाव ता.भोकर येथील हरिनाम सप्ताह प्रसंगी त्या किर्तनकार म्हणून प्रबोधन करत होत्या.

हेची दान देगा देवा तुझा विसर न् व्हावा या अभांगाणे ह.भ.प.कु.कांचनताई शेळके कीर्तनाची सुरुवात केली व पुढे त्या म्हणाल्या की,देशातील तरुणांनी देखील जीवन जगत असतांना संतसंग करावा,जेणेकरून जीवनात कसलीच कमतरता पडणार नाही.यासाठी जगद्गुरू संत तुकोबाराय देवाकडे मागणे घालतात की,तुझा विसर होऊ देवु नको त्याबदल्यात मला मुक्ती,धनसंपदा,जरी मिळत असली तरी ती मला कवडी समान आहे.नवतरुणांनी व्यसनांपासून दूर राहायचं असेल तर संतसंग, संतांच्या विचारात जीवन व्यतीथ केलं पाहिजे.जीवनात मित्र असावेत पण कोना सारखे तर शंभूराजे व कविराज,कृष्ण सुदामा यांच्या सारखे करण सुदम्याने गरिबीमध्ये स्वाभिमान सोडला नाही तर कृष्णाने श्रीमंती मध्ये कधीच गर्व केला नाही.आजकाल लेकरांचा पाहिजे त्यापेक्षा अधिकचा लाड झाल्याने व पाश्चिमात्य संस्कृती चा पगडा त्यांच्यावर बिंबविला जात असल्याने ते व्यसनाधिनतेकडे वळत असून परिनामी आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहे.आपल्या हिंदू संस्कृतीचे जतन व संवर्धन करणे ही गरजेचे असून गावागावात शिक्षणा सोबतच संस्कार देऊन धार्मिक,सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करून त्या कार्यक्रमांतून त्यांचे प्रबोधन व्हावे या हेतूने लेकरांची उपस्थिती वाढवणे गरजेचे आहे.

त्यामुळे लेकरांच्या आचार,विचारात बदल होऊन देश,धर्म, समाज,गुरु,आई वडील यांच्या विषयी आदर भावना निर्माण होण्यास मदत होते.भारतासारख्या पावन भूमीत व असंख्य संतांच्या महाराष्ट्रात आपला जन्म झाला असून पाच लेकरांना एकटी आई जगवते पण आशात पाच लेकरांना मिळून एका आईस जगवणे मुस्किल झाले आहे,याची खरच लाज वाटते. जीवंतपणी आई वडिलांची सेवा करा,देव शोधण्यासाठी जाण्याची गरज नाही तर आई वडीलांच्या सेवेतून देवदर्शन होऊ शकते.तसेच सुनेने सासूस आईप्रमाणे व सासूनेही सुनेला लेकीप्रमाणे वागवले तर या देशातील वृद्धाश्रम नावाचा कलंक मिटल्याशिवाय राहणार नाही.असे परखड मत यावेळी त्यांनी व्यक्त केले.श्रद्धापूर्वक,एकनिष्ठ राहून कुठल्याही देवाची सेवा केल्याने जन्माचे सार्थक झाल्या शिवाय राहत नसल्याचे ही त्या सांगायला विसरल्या नाहीत.यावेळी सुंदर असे हनुमान व रामाचे उदाहरण देऊन त्यांनी उपस्थितांमध्ये चैतन्यरुपी ऊर्जा निर्माण केली.यावेळी ज्ञानेश्वर पाटील लुंगारे बोरगावकर,माधव पाटील सूर्यवंशी, सरपंच प्रतिनिधी संतोष गागदे,सप्ताह आयोजन समितीचे सर्व पदाधिकारी व समस्त गांवकरी,यांसह पंचक्रोशीतील शेकडो भाविक,महिला,वृद्ध,आदींची बहुसंख्येने उपस्थिती होती.


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !