Mon. Dec 23rd, 2024

जि.प.प्रा.शा.उर्दु च्या शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी शेख रईस

Spread the love

तर उपाध्यक्षपदी शेख फारुख व शिक्षण तज्ञ म्हणून अफरोज खान पठाण यांची निवड

अंबुज प्रहार प्रतिनिधी

भोकर : शहरातील खाजा सईद नगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उर्दु च्या शालेय व्यवस्थापन समितीची दि.२२ नोव्हेंबर रोजी निवड करण्यात आली असून अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते शेख रईस यांची,तर उपाध्यक्षपदी शेख फारुख यांची निवड करण्यात आली असून यांच्यासह नवनिर्वाचित कार्यकारिणी तील सर्वांचे परिसरातील अनेक पालक व नागरिकांतून अभिनंदन होत आहे.

खाजा सईद नगर भोकर येथील जि.प.प्रा.शाळा उर्दु च्या शालेय व्यवस्थापन समिती शैक्षणिक वर्ष २०२२- २३ निवडीच्या अनुषंगाने केंद्र प्रमुख शेख जकीयोद्दीन बरबडेकर यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्याध्यापक तथा सदस्य सचिव मजहर अहमद यांच्या प्रमुख उपस्थितीत परिसरातील पालक व नागरिकांची दि.२२ नोव्हेंबर २०२२ रोजी दुपारी १:०० वाजता शाळेत बैठक घेण्यात आली.यावेळी सर्वांनुमते पालक तथा सामाजिक कार्यकर्ते शेख रईस यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली.तर उपाध्यक्षपदी शेख फारुख व शिक्षण तज्ञ म्हणून अफरोज खान पठाण यांची निवड करण्यात आली.याच बरोबर सन्माननिय सदस्य म्हणून शेख नजीब,शेख युसूफ,रिजवाना बेगम एजाजोद्दीन,तन्हार बेगम खाजा इरफानोद्दीन,निलोफर बेगम शेख जावीद,असमा बेगम म.अली यांची निवड करण्यात आली.

सदरील बेठकीस माजी अध्यक्ष मन्सूर खान पठाण, शेख नजीब,शेख सलीम,शेख युसूफ,शेख इरफान,शेख अंनिस,शेख इसा यांसह आदी पालक व नागरिकांची उपस्थिती होती.यावेळी उपरोक्त नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा उपस्थित पालक,केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक,शिक्षक व उपरोक्तांसह आदींनी सत्कार केला आणि शुभेच्छा दिल्या.तर सर्व पदाधिकाऱ्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष शेख जवाजोद्दीन बरबडेकर,तालुकाध्यक्ष इंजि.विश्वंभर पवार,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश बोलेवार,माजी नगरसेवक शेख वकील शेख खैराती यांसह आदींनी अभिनंदन केले व भावी सेवाकार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !