जिल्हाध्यक्ष इंजि.विश्वंभर पवार यांच्या वाढदिवसा निमित्त भोकर येथे विविध कार्यक्रम

भोकर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने शालेय साहित्याचे वाटप व महाआरतीसह विविध कार्यक्रमांचे करण्यात आले आहे आयोजन
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी(अजित पवार गट)उत्तर नांदेड जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य इंजि.विश्वंभर पवार यांचा दि.३ जानेवारी रोजी वाढदिवस असल्याच्या औचित्याने भोकर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने शालेय साहित्याचे वाटप व महाआरतीसह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून सदरील कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन तालुकाध्यक्ष राजेश्वर कदम देशमुख यांसह आदी पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
स्व.डॉ.शंकरराव चव्हाण कृषि उत्पन्न बाजार समिती भोकर चे संचालक इंजि.विश्वंभर पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) उत्तर नांदेड जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यापासून जिल्ह्यात पक्ष वाढीस बळकटी मिळाली आहे. त्यांचे पक्ष संघटन कौशल्य पाहून व लोकोपयोगी कार्याची दखल घेऊन राज्याचे विकसनशील उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी नुकतीच नांदेड जिल्हा नियोजन समितीवर विशेष निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे.अशा लोकोपयोगी बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचा दि.३ जानेवारी रोजी वाढदिवस आहे.यानिमित्ताने भोकर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने दि.३ जानेवारी रोजी सकाळी १०:०० वाजता भोकर येथील एका शाळेत विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे.तर ग्रामीण भागातील गावांतील शाळेत आदी पदाधिकारी याच दिवशी शालेय साहित्याचे वाटप करणार आहेत.तसेच इंजि.विश्वंभर पवार यांना उत्तम आरोग्य व उदंड आयुष्य मिळावे यासाठी कैलास गड भोकर येथील श्री महादेव मंदीर येथे दुपारी ४:०० वाजता महाआरती करण्यात येणार आहे.
सदरील कार्यक्रमांच्या यशस्वीतेसाठी भोकर तालुकाध्यक्ष राजेश्वर कदम देशमुख,ओबीसी विभाग प्रदेश उपाध्यक्ष बालाजी पाटील गौड,ओबीसी विभाग उत्तर नांदेड जिल्हाध्यक्ष आनंद डांगे,जिल्हा उपाध्यक्ष माधव देशमुख,जिल्हा सरचिटणीस अहेमद करखेलीकर,श्याम देशमुख,रवी गेंटेवार, गणेश देशमुख,पंकज देशमुख भोशीकर,सतीश पाटील मातुळकर,तालुका उपाध्यक्ष महेंद्रकुमार कांबळे,राजू कोरटे, श्याम बोडेवार,ॲड.शेख सलीम,सिद्धू पाटील चिंचाळकर, प्रतीक कदम,फईम अहेमद पटेल,शेख जब्बार,तुकाराम महादावाड, बाळासाहेब नांदेकर,शंकर गाढे,राजू पांचाळ,महेंद्र दुधारे,विलास गुंडेराव,विजय पाटील सोळंके,मोहम्मद मझरोद्दीन,गजानन पाटील सोळंके,साहेबराव वाहूळकर, सचिन नांदेकर,नामदेव जाधव,अब्दुल मोईझ अब्दुल खदिर यांसह आदी पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.या कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन तालुकाध्यक्ष राजेश्वर कदम देशमुख व सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.