Mon. Dec 23rd, 2024

जंतनाशक गोळ्या विद्यार्थ्यांना खाऊ घालून केला राष्ट्रीय जंतनाशक दिन साजरा

Spread the love

भोकर येथे आरोग्य विभागामार्फत राबविण्यात आला हा उपक्रम

भोकर : मुलांमध्ये जंतांच्या प्रादुर्भावामुळे कुपोषण, रक्ताक्षयाचे आजार होतात.परिणामी शारीरिक व मानासिक वाढ खुंटणे यासारखे आजार जडतात. जनतेत याबाबद माहिती व्हावी व आजार समुळ नष्ट व्हावा म्हणून आरोग्य विभाग औषधोपचाराचे अनेक उपक्रम राबविते.दि.१० ऑक्टोबर हा राष्ट्रीय जंतनाशक दिन म्हणून पाळला जातो.याच अनुशंगाने आरोग्य विभागामार्फत जंतनाशक गोळ्यांचे वाटप करुन व शालेय विद्यार्थ्यांना गोळ्या खाऊ घालून दि.१० ऑक्टोबर रोजी भोकर येथे जंतनाशक दिन साजरा करण्यात आला आहे.

जंत प्रादुर्भाव आजारांवर आळा घालण्यासाठी प्रबोधन, प्रचार व प्रसारासह आरोग्य तपासणी आणि औषधोपचार मोहीम आरोग्य विभागामार्फत राबविली जाते.याच अनुशंगाने व जंतनाशक दिनाच्या औचित्याने दि.१० ते १५ ऑक्टोबर २०२२ पर्यंत वय वर्ष १ ते १९ वयोगटातील मुलामुलींना शाळा,अंगणवाडी स्तरावर जंतनाशक गोळ्या मोफत दिल्या जाण्याचा उपक्रम आरोग्य विभाग राबवित आहे.राष्ट्रीय जंतनाशक दिनी म्हणजे दि.१० ऑक्टोबर २०२२ रोजी उपरोक्तांना व उर्वरीतांना  दि.१५ ऑक्टोबर २०२२ रोजी सदरील गोळ्या देण्याची मोहिम आरोग्य विभागाने हाती घेतली आहे.

या औचित्याने भोकर शहरातील जिल्हा परिषद कन्या शाळेत दि.१० ऑक्टोबर २०२२ रोजी १६४ शालेय विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळया खाऊ घालण्यात आल्या आहेत.सदरील उपक्रमाची सुरुवात भोकर ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.अशोक मुंडे याच्या हस्ते करण्यात आली व तद्नंतर भोकर ग्रामीण रुग्णालया आरोग्य सहाय्यक सत्यजीत टिप्रेसवार, आरोग्य कर्मचारी पांडुरंग तमलवाड यांनी विद्यार्थ्यांना जंतापासून संरक्षण कसे करावे व जंत नाशक गोळयांचे फायदे सांगितले.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक नरसिंग पसनुरवार,सहशिक्षक मिलिंद जाधव, विलास गायकवाड,रमेश खांडरे,कांचन जोशी,मोहिनी बाचेवाड यांसह आदी शिक्षक उपस्थित होते.याच दरम्यान तालुका वैद्यकिय अधिकारी यांच्या पथकाने विविध शाळा व अंगणवाडी येथे भेटी देऊन राबविण्यात येत असलेल्या मोहिमेचा आढावा घेतला.तर यशस्वीतेसाठी आरोग्य कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !