छायाचित्र हे प्रत्येकांच्या अविस्मरणीय क्षणाचा अविभाज्य अंग असते – पो.उप.नि.दिगंबर पाटील
भोकर येथे फोटोग्राफर्स मल्टिपर्पज असोशिएशन व छायाचित्रकारणांनी केला ‘जागतिक छायाचित्र दिन उत्साहात साजरा
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : कृष्णधवल ते रंगीत छायाचित्रणा पर्यंतच्या काळा दरम्यानचे अनेक छायाचित्रे ऐतिहासिक क्षणाचे साक्षिदार ठरले आहेत. मोबाईलने कितीही प्रगती केली असली तरी कॅमेऱ्याची गुणवत्ता त्यात नसते व कला निपुण छायाचित्रकारांनी टिपलेले छायाचित्र विविध क्षेत्रात आजही वापरली जात असल्याने त्या छायाचित्रांचे महत्व अनन्य साधारण असून ते प्रत्येकांच्या अविस्मरणीय क्षणाचा अविभाज्य अंग असते,असे मनोगत भोकर पोलीस ठाण्यातील कर्तव्यदक्ष अधिकारी पो.उप.नि.दिगंबर पाटील यांनी व्यक्त केले.भोकर येथील फोटोग्राफर्स मल्टिपर्पज असोशिएशन व छायाचित्रकारणांनी आयोजित केलेल्या ‘जागतिक छायाचित्र दिन’ कार्यक्रम प्रसंगी अध्यक्षीय समारोपात ते बोलत होते.
फोटोग्राफर्स मल्टिपर्पज असोशिएशन,महाराष्ट्र राज्य (नोंदणीकृत) संघटना व स्थानिक छायाचित्रकारांच्या वतीने दि.१९ ऑगस्ट २०२३ रोजी शासकीय विश्रामगृह भोकर येथे ‘जागतिक छायाचित्र दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भोकर पोलीस ठाण्यातील कर्तव्यदक्ष अधिकारी पो.उप. नि.दिगंबर पाटील हे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून काँग्रेस कमिटी भोकर चे तालुकाध्यक्ष भगवान दंडवे,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (शरद पवार गट) तालुकाध्यक्ष शिवाजी कदम,सावली प्रतिष्ठान चे अध्यक्ष जेष्ठ पत्रकार बी.आर.पांचाळ,भाजपा महिला आघाडी तालुकाध्यक्षा विजयाताई घिसेवाड -घुमनवाड,राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष जेष्ठ पत्रकार बालाजी नार्लेवाड,सचिव प्रा.आर.के.कदम,कोषाध्यक्ष बालाजी कदम पाटील,विठ्ठल सुरलेकर,सेवानिवृत्त कृषि अधिकारी रमेश घुमनवाड,उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख माधव पाटील वडगावकर यांसह आदींची उपस्थिती होती.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कॅमेरा पुजन करण्यात आले.यानंतर मान्यवरांचा यथोचित सत्कार आयोजकांनी केला व मान्यवरांनी छायाचित्रकारांचा यथोचित सन्मान केला. यावेळी आयोजित कार्यक्रमास अनुसरुन प्रास्ताविकपर मनोगत फोटोग्राफर्स मल्टिपर्पज असोशिएशनचे संस्थापक अध्यक्ष संपादक उत्तम बाबळे यांनी केले.तर उपरोक्त मान्यवरांनी छायाचित्रकारांच्या समस्या जाणून घेत शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले. तर अध्यक्षीय समारोप करतांना पो.उप.नि.दिगंबर पाटील पुढे म्हणाले की,मोबाईलच्या आधुनिक प्रगत काळात प्रत्येकांजवळ महागडा स्मार्टफोन असल्या कारणाने छायाचित्रकारांच्या व्यवसायावर थोडा परिणाम झाला असल्याचे निदर्शनास येत आहे.त्यामुळे छायाचित्रकार अडचणीत सापडले आहेत.परंतू असे असले तरी कला निपुण छायाचित्रकार हे आपली निपुण कला व जीव ओतून कॅमेऱ्यात जी छबी टिपत असतात ते छायाचित्र मोबाईलने टिपलेल्या छायाचित्रांपेक्षा कधीही अनेकपट सरसच असतात. त्यामुळे ग्राहकांना आपले अविस्मरणीय क्षण टिपण्यासाठी छायाचित्रकारांकडे यावेच लागते. म्हणून छायाचित्रकारांनी कधीही खचून जाऊ नये.असे ही ते म्हणाले.
सदरील कार्यक्रमाचे सुरेख असे सुत्रसंचालन फोटोग्राफर्स मल्टिपर्पज असोशिएशनचे संस्थापक अध्यक्ष उत्तम बाबळे यांनी केले.तर उपस्थितांचे आभार उपाध्यक्ष सुधाकर देशमुख यांनी मानले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सचिव मारोती आरटवाड,कोषाध्यक्ष महेश नारलावार,संघटक मनोहर बट्टेवाड,ज्ञानेश्वर पुरी महाराज,अवि दास, रामेश्वर दासरवाड,बाळू पिंगलवाड,बाळू गोत्रे भोकरकर,चंद्रकांत बाबळे,रवि देशमुख,आदिनाथ निमलवाड,विशाल चाटलावार,श्रीकांत बाबळे,प्रेम पडवळे,शुभम शेंडगे,पृथ्वीराज आडे,गणेश पुलकंठवाड,सागर परिहार,बाळू कानगुले,विनोद गोड,सुधीर पुरी,साई पांचाळ,संदेश घुले यांसह आदी छायाचित्रकारांनी परिश्रम घेतले.तसेच या कार्यक्रमास भोकर शहर व तालुक्यातील छायाचित्रकार बहुसंख्येने उपस्थित होते.