Mon. Dec 23rd, 2024
Spread the love

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य विभागाच्या राज्यव्यापी रक्तदान मोहीमेंतर्गत राबविण्यात आला हा उपक्रम

अंबुज प्रहार प्रतिनिधी

भोकर : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राज्य आरोग्य विभागाने दि.९ फेब्रुवारी रोजी एकाच दिवशी सबंध राज्यात राज्यव्यापी रक्तदान मोहीम राबविली असून याच अनुषंगाने ग्रामीण रुग्णालय भोकर येथे घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात जवळपास १९ दात्यांनी रक्तदान केले आहे.

राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय,खासगी रक्तपेढ्या तसेच रक्तदान क्षेत्रातील स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने दि.९ फेब्रुवारी २०२३ रोजी राज्यभर रक्तदान शिबीरांचे आयोजन करण्यात आले होते.राज्यातील रक्ताची वाढती गरज लक्षात घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधत राज्यभर रक्तदान शिबीरे घेण्यात आली.यात राज्यातील जवळपास शासकीय व निमशासकीय मिळून ७५ रक्तपेढ्या,तर धर्मादाय संस्थांच्या तसेच खासगी व रेडक्रॉस सोसायटीच्या मिळून ३६६ रक्तपेढ्या आणि ३३२ रक्तसाठवणूक केंद्रांनी सहभाग घेतला आहे.

ग्रामीण रुग्णालय भोकर येथे घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिराचे सकाळी ११:०० वाजता ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.अनंत चव्हाण यांच्या हस्ते फित कापून उद्घाटन करण्यात आले.यावेळी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे भोकर तालुका प्रमुख अमोल पवार,शहर प्रमुख अजय टाक,स्वप्निल रेड्डी,चैतन बारडकर,अनिल जाधव यांसह रुग्णालयातील डॉक्टर्स व आदींची उपस्थिती होती.या शिबिरात जवळपास १९ दात्यांनी रक्तदान केले.यात ग्रामीण रुग्णालय भोकर येथील अधिपरीचारीका राजश्री ब्राम्हणे व जिजा भवरे या दोन महिला व १७ पुरुष रक्त दात्यांचा समावेश आहे.

तर स्व.डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड येथील रक्तपेढीच्या डॉ.अश्विनी देसाई,डॉ.संस्कृति कोरडे, बालाप्रसाद भालेराव,संदीप नीलकंठे,अजय राठोड,श्रीमती उमा गरड,प्रज्ञा भवरे,विशाखा भवरे,रामराव जोंधळे,राजू औराळे यांनी रात्यांचे रक्त संकलीत केले.तसेच हे शिबिर यशस्वी करण्यासाठी ग्रामीण रुग्णालय भोकर येथील डॉ.नितीन कळसकर,डॉ.सागर रेड्डी,डॉ.राजाराम कोळेकर,डॉ.आर्शिया शेख,डॉ.विजया किनिकर, रक्तपेढी प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी मनोज पांचाळ,बालाजी चांडोलकर,अत्रिनंदन पांचाल,जाहेद अलि बतलवाड,आरोग्य सहायक सत्यजीत टिप्रेसवार,क्ष किरण वैज्ञानिक अधिकारी रोहिणी भटकर,साबेर पाशा,औषध निर्माण अधिकारी गंगामोहन शिंदे,मल्हार मोरे,आरोग्य कर्मचारी पांडुरंग तम्मलवाड,नामदेव कंधारे,बबलू चरण,आर.के. एस.के.समुपदेशक सुरेश डुमलवाड, आरोग्य मित्र सुधाकर गंगातिरे,बाबुमिया व आदींनी उपस्थित राहून परिश्रम घेतले.


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !