Sat. Apr 19th, 2025

ग्रामीण रुग्णालय भोकरचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.अशोक मुंडे स्वेच्छा निवृत्त

Spread the love

अंबुज प्रहार प्रतिनिधी

भोकर : शासकीय ग्रामीण रुग्णालय,भोकरचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.अशोक मुंडे यांनी स्वेच्छा निवृत्तीसाठी विनंती अर्ज सादर केला होता.त्यांचा तो अर्ज आरोग्य विभाग,महाराष्ट्र शासनाने मंजूर केला आहे.त्या अनुषंगाने डॉ.अशोक मुंडे हे दि.३० डिसेंबर २०२२ रोजी स्वेच्छा निवृत्त झाले आहेत.

डॉ.अशोक धोंडिबा मुंडे,वैद्यकिय अधिक्षक,वर्ग-१, शासकीय ग्रामीण रुग्णालय भोकर,जि.नांदेड यांनी खासगी व वैयक्तिक कारणास्तव दि.१ आक्टोबर २०२२ रोजी महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम,१९८२ मधील तरतुदीनुसार स्वेच्छा सेवानिवृत्तीसाठी आरोग्य विभाग,वरीष्ठ व महाराष्ट्र शासनाकडे विनंती अर्ज केला होता.यावरुन महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम, १९८२ मधील नियम ६६ मधील तरतुदीनुसार डॉ.अशोक धोंडिबा मुंडे, वैद्यकिय अधिक्षक,वर्ग-१, ग्रा.रु.भोकर, जि.नांदेड यांनी दिलेला स्वेच्छा सेवानिवृत्तीचा विनंती अर्ज स्विकारण्यात आला असून,त्यांना दि.३० डिसेंबर २०२२ रोजी (म.न.)पासून शासन सेवेतून स्वेच्छेने सेवानिवृत्ती देण्यात आली आहे.सार्वजनिक आरोग्य विभाग शासन निर्णय क्रमांक- स्वेसेनि- १३२२/प्र.क्र.३२६/सेवा-२ गोकुळदास तेजपाल रुग्णालय, इमारत संकुल,१० मजला,मंत्रालय,मुंबई ४०० ००१ यांनी दि.३० डिसेंबर,२०२२ रोजी महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,महाराष्ट्र शासनाचे अवर सचिव चंद्रकांत ह.वडे यांच्या स्वाक्षरीने स्वेच्छा निवृत्ती आदेश पत्र जारी केले असून सर्व संबंधितांना ते पोहचले आहे.

वैद्यकीय अधीक्षक डॉ.अशोक मुंडे यांनी त्यांच्या सेवा कार्यकाळात उत्तम आरोग्य सेवा बजावली असून शासकीय ग्रामीण रुग्णालय भोकर येथे कोरोना प्रादुर्भाव कार्यकाळात आपला जीव धोक्यात घालून अनेकांना जीवनदान दिले आहे.हे अनेकांच्या स्मरणात राहणारी आहे.त्याच्या सारख्या सेवाभावी व्यक्तीमत्वाचा अनेक गरिब व गरजू लोकांना लाभ मिळाला असून त्यांनी बजावलेले कर्तव्य त्यांचे सहकारी डॉक्टर,कर्मचारी,रुग्ण व स्नेहिजण कदापिही विसरु शकणार नाहीत.स्वेच्छा निवृत्ती नंतरच्या पुढील काळात ही त्यांच्या हातून अशिच आरोग्य सेवा घडो, त्यांना उत्तम आरोग्य व उदंड आयुष्य मिळो यासाठी संपादक उत्तम बाबळे व अंबुज प्रहार परिवाराच्या वतीने मन:पुर्वक खुप खुप हार्दिक शुभेच्छा!


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !