‘गाव तेथे स्मशानभूमी’ अभियानांतर्गत जिल्हयात ३०० गावात होणार नवी स्मशानभूमी-डॉ.विपीन इटनकर
भोकर तालुक्यातील १० तर जिल्ह्यातील १७४ गावांमध्ये जमिन हस्तांतर प्रक्रिया पार पडली आहे…
अंबुज प्रहार प्रतिनिधी
नांदेड : दुर्दैवाने गावांतील एखाद्या नागरीकाचा मृत्यू झाल्यास अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमी अभावी कसलीही अडचण येऊ नये व त्यांच्यावर विधीवत अंत्यसंस्कार करता यावे आणि मृत व्यक्तीला सन्मानाने अखेरचा निरोप देता यावा म्हणून ‘गाव तेथे स्मशानभूमी’ अभियान राबविण्यात येत असून या अभियानांतर्गत नांदेड जिल्ह्यातील ३०० गावांत स्मशानभूमी होणार असल्याची माहिती नांदेड जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटणकर यांनी दिली आहे.
‘गाव तेथे स्मशानभूमी’ या जिल्हा प्रशासनाच्या अभियानाअंतर्गत सर्वेक्षण केल्यानंतर जिल्ह्यातील ३०० गावांत स्मशानभूमी नसल्याचे पुढे आले.त्यातील २०० गावांमध्ये उपलब्ध असलेली आवश्यक शासकीय जमिन ग्रामपंचायतीकडे हस्तांतरीत करण्याचा निर्णय घेण्यात आला.त्यातील १७४ गावांमध्ये आतापर्यंत जमिन हस्तांतर प्रक्रिया पार पडली आहे,तर उर्वरीत ठिकाणची कार्यवाही सुरू आहे.जेथे शासकीय जमिन उपलब्ध नाही अशा १०० गावांमध्ये खासगी जमीन विकत घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.ती पूर्ण झाल्यावर या ३०० गावांमध्ये जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून दर्जेदार स्मशानभूमी उभारण्याच्या सूचना नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी दिल्या आहेत.यामुळे दुर्दैवाने त्या ३०० गावांतील एखाद्या नागरीकाचा मृत्यू झाल्यास त्यांच्यावर विधीवत अंत्यसंस्कार करता येऊ शकणार आहे व मृत व्यक्तीला सन्मानाने अखेरचा निरोप देता येईल.
जिल्ह्यातील तालुकानिहाय ती १७४ गावे पुढील प्रमाणे…
१)नांदेड :-चिखली बु.,बाडी बु.,वानेगांव,निळा,२)अर्धापूर:- वाहेदपूर, जांभरून,दाभड,नांदला,भोगांव,३)भोकर:-इळेगांव,सायाळ,नेकली, नांदा खु.,किनाळा,रिट्टा,चिंचाळा, जामदरी,धानजनी,खडकी, ४)मुदखेड:-पिंपळकोठा चोर,वाडी मुक्ताजी,राजवाडी,हज्जापूर, खांबाळा,डोंगरगांव, ५)कंधार:-गुट्टेवाडी, मोहिजा (पं.),मंगलसांगवी, पोखर्णी, नंदनशिवणी,गुलाबवाडी, कौठावाडी,जाकापूर,पांगरा, संगुचीवाडी,६)बिलोली:- नाग्यापूर,हरनाळा,पोखर्णी,पाचपिपळी, हनगुंदा,नागणी,थडीसावळी,दुगांव,७)देगलूर:-चैनपूर,लिंगनकेरूर, बागनटाकळी,आंबुलगा,पिंपळगांव, देगांव बु.,झरी अंतर्गत पेंडपल्ली, भायेगाव ,८) मुखेड श:- हिब्बट,कर्णा,तुपदाळा खु.खपराळ,नंदगांव प.दे.,दापका गुंडोपंत यशवंतनगर तांडा,येवती अंतर्गत पळसवाडी, येवती अंतर्गत चिंचलवाडी,जुना ( फुटतळातांडा अंतर्गत लोभातांडा),(फुटतळातांडा अंतर्गत सेवादासनगर तांडा),खरबखंडगांव,भाटापूर प.दे,९)हदगांव:- हरडफ,शिरड,उमरी खु.,उंचेगांव खु.मरडगा,चौरंबा बु.,जगापूर,कोळी,धानोरा,मालेगांव,पांगरी (म.) १०)धर्माबाद:-पांगरी, पिंपळगाव ध,रोषणगांव, बेल्लूर,सिरजखोड,रामपूर,११)उमरी:-हंगीरगा,कावलगुडा (खु.),सिंधी, शिवनगांव,१२)किनवट:- मानसिंगतांडा,जरोदातांडा,गोंडजेवली,मोरगांव (वरचे),बोधडी (खु.), कंचली (ई),पळशी, सकुनाईक तांडा,भिमपूर,धानोरा (सिं.),बोध, घोगरवाडी, चंद्रपूर,शनिवारपेठ,डोंगरगांव (सि.),उमरी (बा.), पिपळशेंडा,दिग्रस गणेपूर नवे दरसांगवी (सि.),मोहपूर,पाथरी, डोंगरगांव (चि.) रामपूर,पांगरपहाड,कोठारी चि.,इजेगाव,जरोदातांडा, १३)माहूर:- लसनवाडी अंतर्गत चिक्रमवाडी,लसनवाडी,गोंडवडसा, कैरोळी,हडसणी,वाई (बाजार),असोली,लांजी,शे.फ.वझरा,इवळेश्वर, साकुर, चोरड,धानोरा दि.. शिवूर,रूपलानाईक तांडा,वडसा, बंजारातांडा,गुंडवळ,हिंगणी,बोंडगव्हाण,मांडवा,मेंडकी,अनमाळ, दत्तमांजरी,बंजारातांडा,भगवती,१४)नायगांव:-धनज,मौ.चारवाडी, नावंदी,कुंटूर,ईकळीमोर,आंतरगाव,मौ.अहिल्यानगर (चारवाडी), बंजारवाडी,मेळगांव,बळेगांव,१५) लोहा:-धनज (बु.),बोरगाव (कि.), उमरा,देऊळगाव, पोलेवाडी,कारेगाव,हळदव,हातनी,डोलारा,वाळकी (खुर्द), खडकमांजरी, दापशेड,कापसी बु.,१६)हिमायतनगर:-मंगरुळ, पळसपूर,बोरगडी तांडा क्रं.२.,किरमगांव,वटफळी, कार्ला पी,वडगांव जं, विरसणी,वाळकेवाडी पारबाबु एकघरी,बोरगडी तांडाक्रं.२,बोरगाव ता.