Sun. Dec 22nd, 2024

खा.प्रतापराव चिखलीकर यांनी डोलारा येथे पंगतीत घेतला महाप्रसादाचा लाभ

Spread the love

समाजसेवी उपक्रमांसह अखंड दत्तनाम,मुर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा उत्साहात संपन्न

अंबुज प्रहार प्रतिनिधी

भोकर : डोलारा ता.लोहा जि.नांदेड येथे आयोजित अखंड दत्तनाम सप्ताह,मुर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळ्याची टाळ मृदंगाच्या गजरात आणि समाजसेवी उपक्रमांनी मोठ्या उत्साहात दि.२८ जानेवारी रोजी सांगता झाली.यावेळी यावेळी अनेक भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.यावेळेची विशेष बाब म्हणजे सदरील सोहळ्यास उपस्थित असलेले खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी ना बडेजाव केला ना मागेपुढे लवाजमा ठेवला व देवाच्या द्वारी सर्वजण समान असल्याचा प्रत्यय देत सर्वसामान्यांसह पंगतीत बसून महाप्रसादाचा लाभ घेतला आणि ते देखील एक सर्वसामान्य जनसेवकच असल्याची जाणीव उपस्थितांना करून दिली.

प्रयाग राज आश्रम डोलारा ता.लोहा येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला अखंड दत्तनाम सप्ताह, मुर्ती प्राणप्रतिष्ठा व मंदिर कलशारोहण सोहळा.यावेळी खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी पंगतीत बसून महाप्रसादाचा घेतला लाभ… व्हिडिओ

डोलारा ता.लोहा येथील मठपती महंत प्रयाग गिरी महाराज यांच्या पुढाकारातून अखंड दत्तनाम सप्ताह व मंदिर कलशारोहण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सदरील सोहळ्यास भाविक भक्तांनी मोठी गर्दी केली होती.या अलोट गर्दीतील भाविक भक्तांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उदात्त हेतूने आयोजकांनी सप्ताह सोहळ्याच्या ठिकाणी धार्मिक कार्यक्रमांसह काही लोकोपयोगी सेवाभावी उपक्रम ही राबविण्यात आले.यात गरीब व होतकरुंची मोफत नेत्र तपासणी,चष्मे वाटप व आरोग तपासणी शिबीराचा समावेश आहे.सदरील शिबिरात अनेक तज्ञ डॉक्टरांनी सहभाग घेऊन उत्तम सेवाकार्य बजावले.

तर या अखंड दत्तनाम सप्ताह सांगता व मंदिर कलशारोहण सोहळ्यास राज्य व देशभरातून आखाड्यातील शिष्य,संत, महंतांसह काही लोकप्रतिनिधी आणि अनेक मान्यवरांनी हजेरी लावली.यात नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा ही समावेश आहे.खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी सदरील सांगता सोहळ्यास उपस्थित राहून संत, महंतांचे व देव दर्शन घेतले आणि उपस्थित भाविक भक्तांना शुभेछा दिल्या.यावेळेची विशेष बाब म्हणजे खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी आपण उपस्थितांपेक्षा वेगळे आहोत असा बडेजाव केला नाही व सर्वसामान्यांच्या पंगतीला बसून महाप्रसादाचा लाभ घेतला.महाप्रसादाचा रुपाने दररोज अन्नदान करण्यात आले.हजारो भाविक भक्तांनी यांचा लाभ घेतला.तर हजारोंच्या उपस्थितीने उत्साहात संपन्न झालेल्या या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी स्थानिक गावकरी व भाविक भक्तांनी अथक परिश्रम घेतले.


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !