Sun. Dec 22nd, 2024

कें.रि.पो.ब.जवानांचा गौरव करुन भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव दिन केला साजरा

Spread the love

देशाच्या सिमेवर भोकर तालुक्याच्या मातीचा सुगंध नेणाऱ्या जवानांसोबत भोकर तालुका मराठी पत्रकार संघाने केला आनंदोत्सव!

अंबुज प्रहार प्रतिनिधी

भोकर : देशाच्या सुरक्षेची जबाबदारी पार पाडण्यासाठी जांभळी ता.भोकरच्या केंद्रीय रिझर्व पोलीस बलाच्या प्रशिक्षण महाविद्यालयात कठोर परिश्रमांतून प्रशिक्षीत होऊन आपल्या घामासोबत येथील मातीचा सुगंध देशाच्या सिमेवर नेणा-या जवानांचा यथोचित सन्मान करुन व मिठाई भरवून भोकर तालुका मराठी पत्रकार संघाने भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी वर्ष दिन मोठ्या आनंदोत्सवात साजरा केला आहे.

व्हीडीओ…

१५ ऑगस्ट २०२२ रोजी भारतीय स्वातत्र्याचा ७५ वा वर्धापण दिन तथा भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्ष दिन संपुर्ण देशात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे.भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ‘हर घर तिरंगा’ या राष्ट्रीय उपक्रमासोबतच भारतीय स्वातंत्र्यासाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्याग,समर्पण, बलिदान व अनमोल योगदान देणा-या असंख्य स्वातंत्र्य सेनानींचे स्मरण व्हावे,गौरव व्हावा आणि सुवर्णाक्षरी इतिहासाची उजळणी केली जावी या उदात्त हेतून देशात शासन,प्रशासन, सेवाभावी संस्था,पक्ष,संघटना,देशप्रेमी नागरिक यांसह आदींनी दि.१३ ते १५ ऑगस्ट २०२२ दरम्यान विविध राष्ट्रीय उपक्रम राबविले आहेत.याच अनुशंगाने भोकर तालुका मराठी पत्रकार संघाने देखील भोकर तालुक्यातील झिंगारवाडी,सिताराम नाईक तांडा व बाचोटी कँप या गावांत ‘हर घर तिरंगा’ वाटपाचा राष्ट्रीय उपक्रम राबविला आहे.

छायाचित्रे…

मुदखेड जि.नांदेड येथील केंद्रीय रिझर्व पोलीस बल प्रशिक्षण महाविद्यालय अंतर्गत मौ.जांभळी ता.भोकर तेथे प्रशिक्षण उप केंद्र आहे.या प्रशिक्षण केंद्रातून देशातील विविध राज्यातील जवानांना देश संरक्षणासाठी जंगल युद्ध, बाँब फेक,बंदूक चालविणे(फायरींग) यासह आदी शस्त्रविद्येचे प्रशिक्षण दिले जाते.या केंद्रात प्रशिक्षित झालेले हजारो जवान आज देश संरक्षणार्थ सेवा कर्तव्य बजावत आहेत.तर दि.१४ फेब्रुवारी २०१९ रोजी पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी भ्याड हल्ल्यात ४० वीर जवान शहीद झाले होते. त्या शहीद वीर जवानांत याच प्रशिक्षण केंद्रातून प्रशिक्षित होऊन गेलेल्या ६ जणांचा समावेश आहे.देशाच्या सुरक्षेसाठी उन,वारा,थंडी,पाऊस व शत्रूंशी सामना करत सिमेवर कठोर परिश्रम घेणारे हे वीर जवान जांभळी ता. भोकर च्या मातीत तयार होतात.ही भोकर तालुक्यासाठी अभिमानाची बाब आहे.त्याच अनुशंगाने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्ष दिनानिमित्त या प्रशिक्षण केंद्रातील जवानांचा गौरव केला जावा या उदात्त हेतूने भोकर तालुका मराठी पत्रकार संघाने दि.१५ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ११:३० वाजता जवानांचा यथोचित सन्मान व मिठाई वाटप कार्यक्रमाचे आयोजन केले होते.यावेळी केद्रीय रिझर्व पोलीस प्रशिक्षण महाविद्यालय उप केंद्र जांभळी येथील प्रशिक्षक पोलीस उप निरीक्षक करण सिंह,हवालदार मेजर एम.एम.भोसले, हवालदार मेजर लोकेंदर सिंग, हवालदार मेजर महेंद्र इंगळे, काॅस्टेबल पवन कुमार यांसह उपस्थित सर्व जवानांचा भोकर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संपादक उत्तम बाबळे,कार्याध्यक्ष शेख लतिफ भाई,उपाध्यक्ष सिद्धार्थ जाधव,पदाधिकारी कमलाकर बरकमकर,एजास कुरेशी,शुभम नर्तावार यांसह आदींनी पुष्पहार,शॉल देऊन यथोचित सन्मान केला व सर्वांना मिठाई देऊन भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.सर्व जवांनानी देखील पत्रकार बांधवांचा सन्मान करुन शुभेच्छा दिल्या.यानंतर सर्व जवानांसोबत पत्रकार बांधवांनी देखील देशभक्तीपर गितांवर नृत्य करुन आनंदोत्सव साजरा केला.


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !