किन्हाळा,बटाळा व भोकर परिसरात भुगर्भातून आले गुढ आवाज…
परंतू भुकंप मापकावर याची कसलीही नोंद नाही ; त्यामुळे नागरिकांनी घाबरु नये,सतर्क रहावे,अफवांवर विश्वास ठेऊ नये-प्र.उपविभागीय अधिकारी राजेश लांडगे
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : तालुक्यातील किन्हाळा, बटाळा व भोकर शहरातील जिल्हा परिषद हायस्कुलच्या पाठीमाघिल परिसर,शेख फरीद नगर,सोनटक्के कॉलनी,हनुमान नगर,हाश्मी नगर, लक्ष्मी नगर, किनवट रोड,बोरगाव रोड,बटाळा रोड आदी परिसरात दि.२३ सप्टेंबर रोजी दुपारी ४:३५ वाजताच्या नंतर भुगर्भातून गुढ आवाज आले.परंतू आलेल्या त्या गुढ आवाजांची भुकंप मापकावर भुकंप सदृष्य हालचालींची कसलीही नोंद झाली नसल्याने नागरिकांनी घाबरु नये,सतर्क रहावे व अफवांवर विश्वास ठेऊ नये,असे आवाहन प्र.भोकर उपविभागीय अधिकारी तथा तहसिलदार राजेश लांडगे यांनी केले आहे.
भोकर तालुक्यातील किन्हाळा,बटाळा व भोकर शहरातील उपरोक्त ठिकाणी दि.२३ सप्टेंबर रोजी दुपारी ३:३५ वाजताच्या नंतर आणि रात्री १०:०० वाजताच्या दरम्यान पर्यंत भुगर्भातून काही गुढ आवाज आले.पहिला आवाज किन्हाळा परिसरात दुपारी ३:३५ वाजताच्या दरम्यान आला व रात्री १०:०० वाजताच्या दरम्यानचा शेवटचा आवाज देखील याच गावात आला.या गुढ आवाजांनी उपरोक्त ठिकाणचे नागरिक भयभित झाले होते.तसेच समाज माध्यमांवरुन भुकंप झाल्याच्या अफवेचे पेव फुटले होते.हे समजताच प्र.भोकर उपविभागीय अधिकारी तथा तहसिलदार राजेश लांडगे,नायब तहसिलदार संजय सोलंकर,मंडळ महेश वाकडे,तलाठी व आदी महसूल अधिका-यांनी या गावांना आणि भोकर शहरातील त्या परिसरांत प्रत्यक्ष भेटी दिल्या.तसेच झालेल्या प्रकाराबाबत नागरिकांकडून माहिती घेतली व ती माहिती जिल्हाधिकारी आणि वरीष्ठ अधिका-यांना दिली.यानुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या भुकंप मापक यंत्रणेकडे याबाबद चौकशी केली असता भुकंप मापक यंत्रावर भुकंप सदृष्य हालचालींची कसलीही नोंद झाली नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले.
सदरील माहिती राजेश लांडगे यांना प्राप्त झाल्यानंतर त्यांनी उपरोक्त ठिकाणच्या नागरिकांना प्रत्यक्ष भेटून ती माहिती दिली आहे.तसेच ते गुढ आवाज भुकंपाचे नसल्याचे त्यांना सांगितले व भयभीत झालेल्या नागरिकांना धिर दिला. यावेळी ते म्हणाले की, माघिल काही दिवसांपुर्वी पांडूरणा, बोरवाडी,साळवाडी या गाव परिसरात देखील असेच गुढ आवाज आले होते.त्यावेळी भुजल सर्वेक्षण तज्ञ, भुवैज्ञानिकांनी भेट देऊन पाहणी केली होती व त्यांच्या मते ते गुढ आवाज भुगर्भात झालेल्या पोकळ्यांत अतिवृष्टीचे पाणी जमा होऊन निर्माण झालेला गॅस त्या पोकळीतील हवेच्या दाबासोबत पुढे ढकलला जातो व या क्रियेत अशा प्रकारचे गुढ आवाज येऊ शकतात.ते गुढ आवाज भुकंंप सदृष्य हालचालींचे नसतात.तसेच आम्ही लवकरच भुजल सर्वेक्षण तज्ञ व भवैज्ञानिकांची टिम या ठिकाणी बोलवू आणि नेमका हा प्रकार काय आहे ? याचा अभ्यास त्यांच्या मार्फत करु. तुर्तास भुकंप मापकावर भुकंप सदृष्य हालचालींची कसलीही नोंद नसल्यामुळे नागरिकांनी घाबरु नये,परंतू सतर्क रहावे,अफवांवर विश्वास ठेऊ नये व अफवा पसरवू नये.असे आवाहन ही त्यांनी यावेळी केले.तसेच प्रशासन या सर्व बाबींवर लक्ष ठेऊन असल्याची ग्वाही देखील यावेळी त्यांनी नागरिकांना दिली.