Mon. Dec 23rd, 2024

किनवट-म्हैसा वळण रस्त्यावरील एका चौकास दिले भगवान परशुरामांचे नाव

Spread the love

तर दुसऱ्या चौकास दिले धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव

भोकर शहराबाहेरुन जात असलेल्या नुतन वळण रस्त्यावरील या दोन्ही चौकाच्या नामफलकांचे नुकतेच झाले अनावरण

अंबुज प्रहार प्रतिनिधी

भोकर : भोकर शहराबाहेरुन जात असलेल्या किनवट-म्हैसा या नुतन वळण रस्त्यावरील दोन चौकाचे नुकतेच नामकरण करण्यात आले असून किनवट रस्त्यावरील चौकास भगवान परशुराम चौक, तर भोकर-दिवशी रस्त्यावरील चौकास धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक असे नाव देण्यात आले आहे.

भोकर शहराबाहेरुन जात असलेल्या किनवट-म्हैसा या नुतन वळण रस्त्याच्या कामास सुरुवात झाली असून भोकर-किनवट रस्त्यास जोडत असलेल्या व शंकर भट मंगलकार्यालया शेजारील या वळण रस्त्यावरील चौकास भगवान परशुराम चौक असे नाव देण्यात आले आहे.अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ शाखा भोकर च्या वतीने नामकरण करण्यात आलेल्या या चौकाच्या नामफलकाचे दि.१३ नोव्हेंबर २०२२ रोजी ज्येष्ठ नागरिक विजयकुमार कुलकर्णी पाळजकर यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.याप्रसंगी जय परशुरामचा घोषनाद करण्यात आला.यावेळी ब्राह्मण महासंघ शाखा भोकरचे अध्यक्ष ओंकार देशपांडे, उपाध्यक्ष दामोदर जोशी,सचिव धनंजय देशपांडे, प्रकाश गदगे,गोविंद राखे,बाळा साकळकर,राजीव लाठकर,सुधाकर जोशी,यज्ञेश देशपांडे,अविनाश मालेगावकर,सचिन पत्की,संजय देशपांडे,ॲड.दिपक भातलवंडे,ॲड.ओंकार देशपांडे,लक्ष्मीकांत देशपांडे, संतोष जोशी,दत्ता देशपांडे,बबलू चव्हाण,नईम तळेगावकर,श्रीकांत देव यांसह आदींची उपस्थिती होती.

तर भोकरहून दिवशीकडे जाणाऱ्या रस्त्यास ओलांडून किनवट-म्हैसाकडे जाणाऱ्या वळण रस्त्यावरील चौकास मौ.बटाळा येथील छत्रपती शिवाजी महाराज विचार प्रेमी युवकांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक असे नाव दिले असून उपसरपंच गणेश पाटील कापसे,माधव शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत दि.१५ नोव्हेंबर २०२२ रोजी या चौकाच्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले.यावेळी बहुसंख्येने उपस्थित असलेल्या शिवप्रेमी युवकांनी सर्व महामानवासह धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाचा जयघोष केला.


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !