ओबीसी समाजाने संघटित होऊन न्याय हक्कासाठी लढा द्यावा- सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचे मत
किनी ता.भोकर येथे ओबीसी संघर्ष समिती व सर्वपक्षिय कार्यकर्त्यांची बैठक संपन्न
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत तरतूद केल्यामुळे उशिरा का होईना मात्र ओबीसी आरक्षण मिळाले होते ते आरक्षण रद्द झाल्याने ओबीसी समाजावर मोठा अन्याय झाला त्यासाठी आता ओबीसी समाजाने संघटीत होऊन न्याय हक्कासाठी लढा द्यावा असे मत भोकर तालुक्यातील किनी येथे ओबीसी संघर्ष समितीच्या बैठकीत सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी बोलताना व्यक्त केले.

संख्येने अधिक प्रमाणात ओबीसी असूनही या समाजावर फार मोठा अन्याय झालेला आहे.आरक्षण रद्द झाल्यामुळे राजकीय शैक्षणिक सामाजिक विकासापासून त्यांना वंचित राहावे लागणार आहे.म्हणून आता प्रत्येक गावागावातून ओबीसींनी जागृत व्हावे आणि आपल्या न्याय हक्कासाठी पुढे यावे ह्या हेतूने जिल्हा परिषद पाळज सर्कल मधील सर्वपक्षीय ओबीसी कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक दि.१६ जानेवारी २०२२ रोजी किनी येथे आयोजित करण्यात आली होती.बैठकीच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कार्यकर्ते नरसारेड्डी गोपिडवाड हे होते,तर प्रमुख अतिथी म्हणून बहुजन नेते माजी सभापती नागनाथ घिसेवाड,भूमा रेड्डी गोपीडवाड यांची उपस्थिती होती.

प्रारंभी सुभाष नाईक यांनी प्रास्ताविक केले,तर जि.प.सदस्य दिवाकर रेड्डी सुरकुटवाड,संचालक अप्पाराव राठोड,यशवंत सेनेचे मराठवाडा प्रमुख नागोरावजी शेंडगे,ज्येष्ठ कार्यकर्ते एल. ए.हीरे,सरपंच संघटनेचे अध्यक्ष माधवराव अमृतवाड, भीमराव दुधारे,पत्रकार बी.आर.पांचाळ,ॲड.परमेश्वर पांचाळ,अंबादास आटपलवाड,निळकंठ वर्षवार,संदीप पा. गौड,गणपत जाधव आदींनी आपले विचार मांडले.८५ टक्के बहुजन समाज असून सुद्धा सत्तेत वाटा नाही.ओबीसी समाजावर तर फार मोठा अन्याय झालेला असून होते ते आरक्षण देखील रद्द झाल्याने संतापाची लाट निर्माण झाली आहे.केंद्र व राज्य सरकार एकमेकावर ढकलून देऊन ओबीसींना न्याय हक्कापासून वंचित ठेवत आहेत, इम्पेरिकल डाटा देण्यासाठी एकमेकावर लोटत आहेत, जातनिहाय जनगणना केली जात नाही,धन शक्तीचा वापर करून प्रस्थापित मंडळी सत्ता भोगत आहेत,म्हणून आता ओबीसी समाजाने आपसातील मतभेद विसरुन आपल्या माणसासाठी एकत्र या आणि आपल्या माणसाला सत्तेत निवडून आणण्यासाठी प्रयत्न करा असे परखड मत मांडले. बहुजन नेते नागनाथ घिसेवाड यावेळी बोलताना म्हणाले की,आजची ही बैठक सर्वपक्षीय ओबीसी समाजातील कार्यकर्त्यांची आहे. एस.सी,एस.टी,भटक्या-विमुक्त, अल्पसंख्यांक अशा सर्व समाजाने आता विचार करून एकत्र येणे काळाची गरज आहे, आज ओबीसींवर अन्याय झाला उद्या अन्य समाजावर देखील होऊ शकतो,म्हणून वेळीच सर्वांनी संघटन मजबूत करा.आपली माणसं ओळखून सत्तेत पाठवा असे मत मांडले.अध्यक्षीय समारोप नरसा रेड्डी गोपीडवाड यांनी केला.सरपंच सुनील चव्हाण, गंगाधर महादावाड,दत्ता डोंगरे,निळकंठ वर्षेवार,श्रीकांत दरबास्तवार,गितेश बोटलेवाड,मारुती झंपलवाड,नारायण जिलेवाढ, सत्यनारायण अटाळकर,आर.एस.देवकर,दत्ता बोईनवाड,गणेश आरलवाढ,नागोराव दंडे,मनोहर साखरे, आदिनाथ चिंताकुटे आदींची उपस्थिती होती.बैठकीचे सुत्रसंचालन सत्यम रेड्डी यांनी केले,तर आभार वेणूगोपाल रेड्डी यांनी मानले.