उद्या होत आहे श्री साईबाबांच्या मूर्तीची प्रतिष्ठापणा
पवार कॉलनी भोकर येथील पांचाळ परिवाराने बांधले स्वखर्चाने मंदिर
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : पवार कॉलनी भोकर येथील पांचाळ परिवाराने आपल्या स्वखर्चाने घराच्या मोकळ्या जागेत मंदिर उभारले असून उद्या दि.१० एप्रिल रोजी श्रीरामनवमी निमित्त या मंदिरात श्री साईबाबांच्या मुर्तीची प्रतिष्ठापणा करण्यात येणार आहे.तरी या सोहळ्यास भक्तांनी सहभागी होवून श्री साईबाबांचा आशिर्वाद घ्यावा,असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय पांचाळ यांनी केले आहे.
भोकर शहरातील पवार कॉलनीतील रहिवासी असलेले दत्तात्रय देविदास पांचाळ यांनी आपल्या घरासमोरील मालकीच्या जागेत भव्य असे श्री साईबाबा मंदिराचे बांधकाम स्वखर्चाने केले आहे.श्रीरामनवमी निमित्त दि.१० एप्रिल २०२२ रोजी दुपारी १२:०० वाजता या मंदिरात श्री साईबाबांच्या मुर्तीची प्रतिष्ठाणा पंढरपुर येथील अमोल महाराज यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.या मंगल औचित्याने भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून शनिवार,दि.९ एप्रिल २०२२ रोजी रात्री ८:०० वाजता तुकाराम महाराज, सिडको, नांदेड यांचे किर्तन होणार आहे.तर रविवार,दि.१० एप्रिल रोजी उत्तम बन महाराज,विठ्ठल महाराज शनी मंदिर भोकर,लक्ष्मण शास्त्री महाराज,जामदरीकर, मधुकर महाराज,शेंबोलीकर,निजानन महाराज,परमेश्वर महाराज,महंत प्रभाकर कपाटे महाराज यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.तसेच मुर्तीची प्रतिष्ठापणेनंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.तरी भाविक भक्तांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे,असे आवाहन गोविंद पांचाळ,श्रीनिवास पांचाळ,अविनाश पांचाळ व पांचाळ परिवाराने केले आहे.