Mon. Dec 23rd, 2024

इंधन दरवाढी विरूद्ध भोकरमध्ये काँग्रेसने केले आंदोलन

Spread the love

मोदी सरकार कडून झालीय सर्वसामान्यांची निराशा-गोविंदराव शिंदे नागेलीकर

अंबुज प्रहार प्रतिनिधी

भोकर : इंधन दरवाढीच्या विरूद्ध केंद्र सरकारच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाच्या वतीने सोमवार दि.४ एप्रिल रोजी भोकरमध्ये निषेधरॅली काढून निदर्शनाने आंदोलन करण्यात आले.यावेळी मोदी सरकारच्या काळात महागाई प्रचंड वाढली असून सर्वसामान्यांची घोर निराशा झाल्याची टीका काँगेस पक्षाचे नांदेड जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर यांनी केली.

पेट्रोल,डिझेल,गॅस सिलेंडर,रासायनिक खतांची दरवाढ प्रचंड झाल्याने केंद्र सरकारच्या निषेधार्थ भोकरमध्ये तालुका व शहर काँग्रेस कमेटीच्या वतीने दि.४ एप्रिल २०२२ रोजी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून निषेधरॅली काढण्यात आली व उपविभागीय अधिकारी व तहसिल कार्यालयासमोर इंधन दरवाढी विरूध्द प्रचंड अशा घोषणा देवून केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला.सदरील आंदोलना संदर्भात तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी तहसिल कार्यालयासमोर आंदोलकांना संबोधित करतांना जिल्हाध्यक्ष गोविंदराव नागेलीकर हे म्हणाले की, केंद्रातील भाजप सरकार शेतकरी व सर्वसामान्यांच्या हिताचे नाही,मोदी सरकार कडून जनतेचा अपेक्षा भंग झाला आहे.महागाईमुळे जनतेचे जगणे कठीण झाले आहे,असे ही ते म्हणाले.संपन्न झालेल्या आंदोलनात जि.प.कृषि व पशुसंवर्धन सभापती बाळासाहेब पाटील रावणगांवकर, तालुकाध्यक्ष तथा सभापती जगदीश पाटील भोसीकर, जिल्हा उपाध्यक्ष भगवान दंडवे, शहराध्यक्ष रमिज उर्फ खाजु इनामदार,नरसारेड्डी गोपीलवाड, उपसभापती गणेश राठोड,संचालक रामचंद्र मुसळे, अल्पसंख्याक सेल तालुकाध्यक्ष मिर्झा ताहेर बेग,माधव अमृतवाड,श्याम रेड्डी, सत्यम रेड्डी,गंपू पाटील,शंकरराव देवठाणकर,राजु पाटील दिवशीकर,बाबुराव पाटील आंदबोरीकर,मनोज गिमेकर, उज्वल केसराळे,विनोद चव्हाण,संचालक आप्पाराव राठोड,विक्रम क्षिरसागर,श्नीकांत दरबस्तवार,एम.ए.रजाक, गोविंद मेटकर,सुहास पवार,सना इनामदार,सिद्धेश्वर पिटलेवाड,मन्सूर पठाण,जनार्धन कवळे, सुरेश जाधव, धनराज जाधव,मधुकर गोवंदे,गौतम कसबे,रंगराव कदम, सुरेश कावळे,फारूख करखेलीकर,आनंद ढोले,आदीनाथ चिंताकुटे,बालाजी राठोड,दत्ता जाधव,गडम भुमारेड्डी,राघोबा सोळंके,सय्यद रफीक,अशोक जाधव,सुरेश जाधव,यांसह बहुसंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते.


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !