Mon. Dec 23rd, 2024

आ.गोपीचंद पडळकर यांच्यावर चप्पल फेक करणाऱ्या समाज कंटकास त्वरित अटक करा

Spread the love

भोकर सकल ओबीसी समाजाने निवेदनाद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली मागणी

अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : ओबीसी नेते तथा भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर चप्पल फेक करून मराठा व ओबीसी समाजात तेढ निर्माण करणाऱ्या समाज कंटकावर त्वरित कारवाई करून अटक करण्याची मागणी भोकर तालुका सकल ओबीसी समाज बांधवाकडून तहसीलदार भोकर यांच्यामार्फत दि.११ डिसेंबर रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एका लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

या निवेदनात पुढे नमूद करण्यात आले आहे की,ओबीसी नेते आ.गोपीचंद पडळकर हे दि.९ डिसेंबर २०२३ रोजी इंदापूर येथील एका उपोषण स्थळी भेट देण्यासाठी जात असतांना काही समाजकंटकांनी अर्वाचे भाषेत शिवीगाळ करून त्यांच्यावर चप्पल फेक करत भ्याड हल्ला केला आहे.तसेच मराठा आणि ओबीसी समाजात तेढ निर्माण करण्यासाठी सोशल मीडियावर व अन्य माध्यमातून धमक्या आणि चितावणीखोर वक्तव्ये करण्यात येत आहेत.तेव्हा शासनाने अशा चितावणीखोर समाजकंटकांचा शोध घेऊन त्यांच्याविरुद्ध तात्काळ कठोर कारवाई करून अटक करण्यात यावी.तसेच अशा वाढलेल्या हुकूमशाही व दादागिरी प्रवृत्तीला वेळीच आवर घालावा अन्यथा सकल ओबीसी समाज मोर्चे व आंदोलने करून रस्त्यावर उतरेल याची शासनाने नोंद घ्यावी, असा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.  सदरील निवेदन तहसिलदार राजेश लांडगे यांच्या मार्फत पाठविण्यात आले असून या निवेदनावर सकल ओबीसी नेते नामदेवराव आयलवाड,मोहनराव राठोड,ॲड.शेखर कुंटे,संतोष आलेवाड,सुरेशराव बिल्लेवाड,बालाजी शानमवाड,गणेश राठोड,राजकुमार अंगरवाड,रामचंद्र येईलवाड,विशाल दंडवे, बि.आर.पांचाळ,सतीश देशमुख,गोविंद मेटकर,सुनील मदनवाड,ॲड.प्रदीप राठोड,जगन पाटील बुट्टनवाड,साई राठोड,नंदकुमार कोसबतवार,पांडुरंग वर्षेवार,आदिनाथ चिंताकुटे यांसह आदी ओबीसी नेते व कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !